Donald Trump
Donald TrumpDainik Gomantak

Donald Trump Oil Claim: 'भारत रशियाकडून तेलाची खरेदी थांबवणार'! ट्रम्प यांच्या नवा दाव्यामुळे चर्चेला उधाण

India Russia Oil: भारताने रशियाकडून पेट्रोलियम पदार्थांची सतत खरेदी करणे, हा सध्या कळीचा मुद्दा बनला असून, त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
Published on

वॉशिंग्टन: ‘‘भारत रशियाकडून तेलाची खरेदी करणे थांबवणार असल्याचे आश्वासन माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे,’’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ‘‘रशिया-युक्रेन संघर्षामध्ये रशियावर दबाव आणण्यासाठीचे हे मोठे पाऊल आहे,’’ असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

निर्बंध असूनही भारताने रशियाकडून पेट्रोलियम पदार्थांची सतत खरेदी करणे, हा सध्या कळीचा मुद्दा बनला असून, त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी नवा दावा करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

बुधवारी (ता. १५) आपल्या ओव्हल कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘‘भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करत असल्याबद्दल अमेरिका आनंदी नाही. अशा खरेदीमुळे रशियाच्या संघर्षासाठी आर्थिक मदत झाली. ते (मोदी) माझे मित्र आहेत, आमचे खूप चांगले संबंध आहेत. त्यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याने आम्ही खूश नव्हतो. कारण त्यामुळे रशियाने हे युद्ध चालू ठेवले. त्या युद्धात दीड लाख नागरिकांचा मृत्यू झाला.

Donald Trump
Trump Tariff: ट्रम्प यांच्या औषध उद्योगांवरील आयात शुल्कवाढीमागे आहेत तीन कारणं; भारतावर याचा खरचं काय परिणाम होणार?

भारत तेलखरेदी करत असल्याबद्दल मला आनंद झाला नाही. रशियाकडून तेलखरेदी न करण्याचे मोदींनी मला आश्वासन दिले आहे. हे एक मोठे पाऊल आहे. आता आपल्याला चीनकडूनही तेच अपेिक्षत आहे.भारत कदाचित त्वरित खरेदीत कपात करू शकणार नाही; परंतु प्रक्रिया सुरू झाली आहे.’’

Donald Trump
Donald Trump: ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का? टॅरिफ रद्द झाल्यास अब्जावधी डॉलर्सचा परतावा देण्यासाठी ट्रेजरी विभाग सज्ज

जर भारताने तेलखरेदी केली नाही, तर रशियाला आर्थिक मदत होणार नाही. भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करीत असल्याबद्दल अमेरिका आनंदी नाही. मात्र, आता ही खरेदी थांबविण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.

डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com