"मी नसतो तर तुम्ही तुरुंगात असता!", ट्रम्प यांनी बेंजामिन नेतन्याहू यांना झापलं; 'त्या' रिपोर्टनं जागतिक राजकारणात उडवली खळबळ

Donald Trump Calls Netanyahu Crazy: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.
Trump Netanyahu Phone Call Axios
Donald Trump Calls Netanyahu CrazyDainik Gomantak
Published on
Updated on

Trump Netanyahu Phone Call Axios: अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या अत्यंत संवेदनशील शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. लेबनानमध्ये इस्रायलकडून वाढवल्या जाणाऱ्या हिंसेबाबत ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना फोन करुन अत्यंत कडक शब्दांत सुनावले. 'एक्सियोस'च्या एका खळबळजनक अहवालानुसार, ट्रम्प यांनी या संभाषणादरम्यान नेतन्याहू यांना 'वेडे' म्हटले असून, त्यांच्यावर कृतघ्नतेचा गंभीर आरोप केला.

अमेरिकन अधिकारी आणि या फोन कॉलची माहिती असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. ट्रम्प यांनी इस्रायलच्या बेरुत शहरावरील हल्ल्याच्या योजनेलाही तात्काळ स्थगिती देण्यास भाग पाडले. लेबनानच्या राजधानीवर बॉम्बहल्ला करण्याच्या इस्रायली धमक्यांमुळे जगात इस्रायल अधिक एकटा पडेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.

Trump Netanyahu Phone Call Axios
US Strikes Iran: अमेरिकेकडून इराणवर हवाई हल्ला; ट्रम्प यांच्या न्यूक्लियर डीलच्या दाव्यादरम्यान मिडल ईस्टमध्ये पुन्हा तणाव

या फोन कॉलदरम्यान ट्रम्प यांनी अत्यंत संतप्त होत नेतन्याहू यांना सांगितले की, त्यांनीच नेतन्याहूंना तुरुंगात जाण्यापासून वाचवले. ट्रम्प यांचा हा संदर्भ इस्रायली नेत्यावर सुरु असलेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्यादरम्यान त्यांनी दिलेल्या पाठिंब्याशी संबंधित होता. अहवालानुसार ट्रम्प म्हणाले, "तुम्ही पूर्णपणे वेडे आहात. जर मी नसतो तर तुम्ही आज तुरुंगात असता. मी तुमचा जीव वाचवत आहे, पण आता प्रत्येक जण तुमचा द्वेष करतोय आणि तुमच्यामुळे प्रत्येक जण इस्रायलचा तिरस्कार करु लागला आहे." गेल्या वर्षी जानेवारीत ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्यानंतर, दोन्ही नेत्यांमधील हे आजवरचे सर्वात वाईट आणि तणावपूर्ण संभाषण मानले जात आहे.

Trump Netanyahu Phone Call Axios
US Israel Iran Conflict: इराण युद्धाच्या रणनीतीवरुन ट्रम्प-नेतान्याहू यांच्यात फोनवर कडाक्याचं भांडण; अमेरिकेच्या भूमिकेमुळे इस्रायल नाराज VIDEO

ट्रम्प यांच्या या संतापाचे मुख्य कारण म्हणजे मध्य पूर्व आशियातील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिकेची (America) इराणसोबत सुरु असलेली शांतता वार्ता होय. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी नेतन्याहूंना विचारले की, "तुम्ही हे सर्व काय करत आहात?" लेबनानमधील इस्रायलच्या आक्रमक भूमिकेमुळे इराणसोबतची महत्त्वाची चर्चा धोक्यात येत असल्याचा ट्रम्प यांचा समज झाला होता. इस्रायल केवळ धमक्याच देत नसून, दक्षिण लेबनानमध्ये आपले जमिनीवरील लष्करी अभियानही वाढवत आहे.

तसेच, लेबनानमधील निष्पाप नागरिकांच्या सुरक्षेबाबत ट्रम्प यांनी चिंता व्यक्त केली. हिजबुल्लाच्या एका कमांडरला संपवण्यासाठी संपूर्ण इमारती जमीनदोस्त करण्याच्या इस्रायली योजनेला ट्रम्प यांनी तीव्र विरोध दर्शवला. या वादळी फोन कॉलनंतर एका इस्रायली अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, इस्रायल आता बेरुतमधील हिजबुल्लाच्या तळांवर तशा प्रकारचा मोठा हल्ला करण्याचा विचार करत नाहीये. अमेरिका आणि इस्रायलच्या नेत्यांमधील हा मतभेद नवा नाही.

Trump Netanyahu Phone Call Axios
US Iran War: अखेर युद्ध थांबलं! ट्रम्प प्रशासनाची मोठी घोषणा, पण घातली 'ही' कडक अट

ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यात गुंतागुंतीचे संबंध राहिले आहेत, जिथे जाहीरपणे ते एकमेकांचे समर्थन करतात, परंतु खाजगीत त्यांच्यात अनेकदा तीव्र तणाव निर्माण होतो. यापूर्वीही अनेकवेळा त्यांच्यात वाद झाले आहेत, तरीही त्यांनी इराणसारख्या (Iran) मुद्द्यांवर एकत्र काम केले; मात्र सद्यस्थितीतील हा वाद अधिक गंभीर वळणावर पोहोचला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Donald Trump Threatens Oman
US Israel Iran Strategy Conflict
Trump National Security Meeting
Iran Five Demands For Talk
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com