

US Iran War Ceasefire 2026: गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या इराण आणि अमेरिका युद्धाबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली. 28 फेब्रुवारी 2026 रोजी सुरु झालेल्या या भीषण युद्धावर आता अखेर ब्रेक लागला. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने अधिकृत घोषणा केली असून इराणसोबत सुरु असलेली लढाई आता समाप्त झाली असल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेच्या 'वॉर पॉवर रिझोल्यूशन' कायद्यांतर्गत, संसदेच्या 60 दिवसांच्या अनिवार्य मंजुरीची मुदत संपण्यापूर्वीच ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. या युद्धविरामामुळे जागतिक स्तरावर मोठा दिलासा व्यक्त केला जात आहे.
या युद्धविरामाच्या आदेशात नौदलाच्या नाकेबंदीचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, प्रशासनाने एक कडक अटही घातली. वॉर पॉवर रिझोल्यूशननुसार, जर इराणकडून अमेरिकेच्या कोणत्याही नौदलाच्या जहाजावर हल्ला झाला, तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हे 'चीफ-ऑफ-कमांडर' म्हणून संसदेच्या पूर्वपरवानगीशिवाय तातडीने बचावात्मक लष्करी कारवाईचे आदेश देऊ शकतात. एकीकडे युद्धावर ब्रेक लागला असतानाच, दुसरीकडे क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली. फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी पुष्टी केली की, राजकीय तणाव आणि नुकत्याच झालेल्या संघर्षानंतरही इराणचा संघ 2026 च्या फिफा विश्वचषकात सहभागी होणार आहे.
यावर्षीचा फिफा विश्वचषक 11 जूनपासून अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे. इराणला या स्पर्धेत 'ग्रुप G' मध्ये स्थान देण्यात आले असून त्यांचे सामने न्यूझीलंड आणि बेल्जियमविरुद्ध लॉस एंजेलिसमध्ये, तर इजिप्तविरुद्धचा सामना सिएटलमध्ये खेळवला जाईल. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी फिफा प्रमुखांना आश्वासन दिले की, इराणच्या संघाचे अमेरिकेत स्वागत केले जाईल. मात्र, इराणसोबतची लढाई संपली असली, तरी अमेरिका इस्रायलला पुढील युद्धासाठी सज्ज करत आहे.
गेल्या 24 तासांत अमेरिकेने इस्रायलला 6500 टन शस्त्रे आणि लष्करी साहित्य पाठवले असून, दोन मालवाहू जहाजे अशदोद आणि हैफा बंदरात पोहोचली आहेत. गेल्या 60 दिवसांत अमेरिकेने इस्रायलला एकूण 1,15,600 टनांहून अधिक युद्धसामग्री पुरवली असून दररोज सरासरी 2000 टन साहित्य पाठवले जात आहे. अमेरिकेत नव्या हल्ल्यांबाबत वादविवाद सुरु असले, तरी इस्रायलला होणारा युद्धस्तरावरील पुरवठा अद्याप सुरुच आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.