Apple WWDC 2024: अ‍ॅपलकडून दमदार फिचर्सचा 'तोहफा'; iOS18, Watch OS11, Siri 2.0 आणि बरंच काही

WWDC 2024 Roundup: अमेरिकन टेक कंपनी Apple ने वर्ल्ड वाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स 2024 मध्ये iPadOS 18, WatchOS 11, tvOS 18 आणि MacOS sequoia लाँच केले.
Apple WWDC 2024
Apple WWDC 2024Dainik Gomantak

WWDC 2024 Roundup: आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) हे आजच्या जगाचे वास्तव आहे. जर तुम्हाला स्पर्धेत टिकायचे असेल तर तुमची AI वर मजबूत पकड असायला हवी. जगभरातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या त्यांचे स्वतःचे AI मॉडेल विकसित करत आहेत. नुकतेच गुगलने त्याचे एआय मॉडेल जेमिनी एआय अपग्रेड केले. Apple देखील या शर्यतीत स्वत:ला मागे ठेवू शकत नाही, म्हणून त्यांनी त्यांच्या वर्ल्ड वाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स 2024 मध्ये (WWDC 2024) नवीन AI फिचर्स लाँच केले आहेत. ॲपलने हे सर्व ओपनएआयच्या चॅटजीपीटी मॉडेलच्या मदतीने केले आहे.

Apple ने WWDC 2024 मध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या. AI व्यतिरिक्त, कंपनीने नवीन ऑपरेटिंग सिस्टम देखील लाँच केली, ज्यामध्ये iOS 18, iPadOS 18, VisionOS 2, macOS Sequoia आणि WatchOS11 यांचा समावेश आहे. टिम कुक यांच्या नेतृत्वाखालील ॲपलने सांगितले की, त्यांचे अनेक सॉफ्टवेअर चॅटजीपीटीशी जोडले गेले आहेत.

Apple इंटेलिजन्स: ऍपलचे एआय वर्ल्ड

संपूर्ण ताकदीनिशी AI क्षेत्रात उतरलेल्या Apple ने आपल्या AI वर्ल्डला Apple Intelligence असे नाव दिले आहे. या अंतर्गत कंपनीने AI असिस्टंट Siri मध्ये मोठे बदल केले आहेत. यूजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन कंपनी एआय फीचर्सचा फायदा देणार आहे. Apple Intelligence Concept कसे काम करते ते जाणून घेऊया...

ॲपल इंटेलिजन्सचे काम

ॲपलने 'ऍपल इंटेलिजन्स' या नावाने एआयच्या जगात प्रवेश केला आहे. यूजर्सची गोपनीयता लक्षात घेऊन एआय फीचर्सचे फायदे प्रदान करणे हा उद्देश आहे. ॲपल इंटेलिजन्सबद्दल बोलताना टीम कुक म्हणाले की, आता 'पर्सनल इंटेलिजन्स'ची गरज आहे. ॲपलसाठी हे पुढचे मोठे पाऊल आहे. Apple Intelligence इमेज तयार करु शकते, वेगवेगळ्या ॲप्समध्ये काम करु शकते, तुम्ही काय म्हणता ते समजू शकते आणि जनरेटिव्ह AI च्या मदतीने दैनंदिन कामे सुलभ करु शकते. याद्वारे तुम्ही ईमेल आणि कंटेट लिहू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही ऑडिओ अर्थात आवाजास टेक्स्टमध्ये समराइज करु शकता, नोटिफिकेशन सेट करु शकता, इमेज आणि इमोजी देखील तयार करु शकता.

Apple WWDC 2024
Apple Farming In Goa: जर्मनी रिटर्न इंजिनिअरने केली कमाल, उष्ण गोव्यात फुलवली सफरचंदाची शेती Watch

ॲपल इंटेलिजन्स या डिव्हाइसवर चालतील

Apple Intelligence तुमच्या Apple डिव्हाइसवर काम करेल. तथापि, काही कठीण कामांसाठी ते प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्युटची मदत घेईल. कंपनीने सांगितले की, तुमचा डेटा स्टोर केला जाऊ शकत नाही. Apple Intelligence, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max, iPad यासह M1 किंवा नंतरच्या चिपसेटसह MacBooks वर चालेल. अमेरिकेत, हे iOS18, iPadOS 18 आणि macOS Sequoia वापरकर्त्यांसाठी विनामूल्य उपलब्ध असेल.

iPadOS 18

iOS 18 प्रमाणे, iPadOS 18 मधील कंट्रोल सेंटर तुमच्या गरजेनुसार कस्टामाइज केले जाऊ शकते. त्याच्यात आयकॉन्स आणि विजेट्सचा कलर बदलण्याची सोय आहे. ॲप आयकॉनला डार्क मोडमध्येही वापरता येते. यात डायनॅमिक आयलंड, गेम मोड आणि मेसेज इफेक्टसाठीचाही सपोर्ट मिळतो.

VisionOS 2

Apple ने VisionOS च्या पहिल्या मेजर सॉफ्टवेअर अपग्रेडमध्ये विविध नवीन फीचर दिली आहेत. त्याच्या जेश्चर सिस्टीममध्ये एक नवीन क्विक अॅक्शन फीचर दिले गेले आहे, जेणेकरुन ते सहजपणे ऍक्सेस करता येते. याशिवाय, फोटो ॲपमध्ये स्पॅटियल फोटो फीचर दिले आहे, जे तुमच्या 2D फोटो लायब्ररीला स्पॅटियल फोटोंमध्ये कन्वर्ट करु शकते. इतकेच नाही तर यामध्ये मॅक व्हर्च्युअल डिस्प्ले फीचर देखील देण्यात आला आहे, जो हाय रिझोल्यूशन आणि चांगल्या क्वालिटीसह येतो. Apple ने Vision OS मध्ये ट्रॅव्हल मोड अपग्रेड केले आहे.

Apple WWDC 2024
Facebook आणि Instagram च्या कमाईत तेजी, भारतातील आयफोनच्या विक्रमी विक्रीमुळे Apple मालामाल

tvOS 18

Apple ने आपल्या ऍपल टीव्ही सेट-टॉप बॉक्सच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये इनसाइटसह नवीन फीचर्स दिले आहे. हे ऑपरेटिंग सिस्टीम 21:9 आस्पेक्ट रेशो असलेल्या प्रोजेक्टरला सपोर्ट करते. याशिवाय, Apple ने ऑडिओसाठी Enhance Dialogue फीचर दिले आहे. याशिवाय, टीव्हीसाठी या नवीन ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आणखीही अनेक यूनीक फीचर्स उपलब्ध असतील.

watchOS 11

WWDC 2024 मध्ये, Apple ने आपली स्मार्टवॉचची ऑपरेटिंग सिस्टमही अपग्रेड केली आहे. त्याचे फिटनेस आणि हेल्थ फीचर्स अधिक सुसज्ज बनवले आहे.

iPadOS 18

Apple ने iPadOS 18 मध्ये नवीन कस्टमायझेशन फीचर्स दिले आहे. यूजर्संना iPadOS 18 मध्ये iOS 18 सारखी अनेक कस्टमायझेशन फिचर्स देखील मिळतील. यामध्ये तुम्हाला होम स्क्रीन आयकॉनपासून ते लेआउट बदलण्यापर्यंतचा ऑप्शन मिळेल. याशिवाय, कंट्रोल सेंटरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यूजर्स त्यांच्या आवडीनुसार त्याचे आयकॉन कस्टमाइझ करु शकतील.

Apple WWDC 2024
iPhone 15 Series मध्ये Apple देणार वेड लावणारी फिचर्स

macOS 15 Sequoia

Apple ने WWDC 2024 मध्ये macOS 15 Sequoia ची घोषणा केली आहे. या ऑपरेटिंग सिस्टिमच्या माध्यमातून यूजर्स आता आयफोन स्क्रीनवरुन आपला मॅक कंट्रोल करु शकणार आहेत. याशिवाय, यामध्ये अनेक प्रकारचे कस्टमायझेशन फीचर्सही देण्यात आली आहेत. इतकेच नाही तर नवीन macOS साठी एक स्टॅंडअलोन पासवर्ड ॲप उपलब्ध असेल, ज्याद्वारे यूजर्स त्यांचे पासवर्ड मॅनेज करु शकतील. ही नवीन ऑपरेटिंग सिस्टीम AI फीचर्संनी सुसज्ज असेल. यामध्ये Apple intelligence देखील देण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com