Apple Farming In Goa: जर्मनी रिटर्न इंजिनिअरने केली कमाल, उष्ण गोव्यात फुलवली सफरचंदाची शेती Watch

Apple Farming In Goa:एडवर्ड जर्मनीतून परतल्यानंतर पूर्णकाळ शेतीत रमले आणि त्यांनी सफरचंदाचे यशस्वी उत्पादन घेऊन दाखवले.
Apple farmer edward mendes
Apple farmer edward mendesDainik Gomantak
Published on
Updated on

Apple Farming In Goa

गोव्यातही सफरचंदाची यशस्वी उत्पादन घेतले जाऊ शकते, हे राय येथील एका शेतकऱ्यांने सिद्ध करुन दाखवले आहे. संगणक अभियंता असलेल्या एडवर्ड मेंडिस यांनी हा चमत्कार करुन दाखवला आहे.

एडवर्ड यांनी काहीकाळ नोकरी केल्यानंतर शेती करण्याचा निर्णय घेतला. एडवर्ड जर्मनीतून परतल्यानंतर पूर्णकाळ शेतीत रमले आणि त्यांनी सफरचंदाचे यशस्वी उत्पादन घेऊन दाखवले.

एडवर्ड मेंडिस यांनी तीन वर्षापूर्वी हिमाचल प्रदेश येथून दोनशे सफरचंदाची आणली त्यापैकी 48 रोपे मरण पावली. दरम्यान, उरलेल्या रोपांना तीन वर्षानंतर सफरचंद लागली आहेत. मेंडिस यांची सध्याच्या घडीला गोव्यातील एकमवे आणि सर्वात मोठी सफरचंदाची बाग आहे.

एडवर्ड यांच्या मेहनतीला यश आल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सफरचंदाची प्रगत प्रजातीची दोनशे रोपे आणली होती, त्यातील काही मरण पावली. उरलेल्या रोपांना आता फळे लागल्याचे त्यांनी गोमन्तकच्या विशेष मुलाखतीत सांगितले.

Apple farmer edward mendes
Margoa News: पोटात अन्नाचा एकही कण नाही, उपाशी राहिल्यानेच मडगावात सख्ख्या भावांचा मृत्यू

सफरचंदाच्या या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही झाडे 45 अंश सेल्सिअस तापमानातही तग धरू शकतात. त्यामुळे गोव्यात किंवा भारतात कुठेही त्यांची लागवड करता येते.

मेंडीस यांनी 10 जानेवारी 2022 रोजी सफरचंदाच्या टिश्यू कल्चरची लागवड केली. यानंतर झाडे आठ महिन्यांची झाल्यावर त्यांनी एचआरएमएन 99, ॲना आणि गोल्डन डेलीशियस या जातींची रोपे लावली.

दरम्यान, बदलत्या हवामानचा सफरचंदाच्या फळांवर परिणाम होत असल्याने मेंडिस यांनी चिंता व्यक्त केली. हवामान बदलानंतर फळाच्या रंगातही बदल होत असल्याचे मेंडिस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com