America Accident: अमेरिकेत भीषण अपघात! यू-टर्न घेणाऱ्या ट्रकला धडकली कार, तिघांचा जागीच मृत्यू; भारतीय चालकावर हत्त्येचा आरोप VIDEO

Florida Truck Crash Video: अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातून भीषण अपघाताची एक घटना समोर आली आहे. या अपघातात एका भरधाव कारने थेट ट्रकला धडक दिली.
America Accident News
America AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Florida Truck Crash Video: अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातून भीषण अपघाताची एक घटना समोर आली आहे. या अपघातात एका भरधाव कारने थेट ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाची ओळख पटली असून तो हरजिंदर सिंह नावाचा भारतीय नागरिक आहे. हरजिंदरवर निष्काळजीपणे वाहन चालवण्याऐवजी थेट हत्त्येचा आरोप ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

America Accident News
America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

नेमकं काय घडलं?

दरम्यान, ही घटना घडली तेव्हा महामार्गावर वाहतूक सुरु होती. अचानक ट्रक चालकाने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता किंवा नियम न पाळता रस्त्याच्या मध्यभागी यू-टर्न (U-turn) घेण्यास सुरुवात केली. ट्रॅकचा आकार मोठा असल्याने त्याने महामार्गाचा बराचसा भाग अडवला. त्याचवेळी, मागून भरधाव वेगाने एक कार येत होती. ट्रकला अचानक वळताना पाहून कार चालकाला गाडी नियंत्रित करण्यासाठी वेळच मिळाला नाही आणि वेगाने येणारी कार थेट ट्रकला धडकली. धडक इतकी जोरदार होती की, कारचा चक्काचूर झाला.

त्याचवेळी, या अपघाताचा (Accident) एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, ट्रक अचानक वळतो आणि संपूर्ण रस्ता अडवतो. त्यानंतर काही क्षणातच मागून येणारी कार ट्रकला जोरदार धडक देते. या अपघातानंतर घटनास्थळी गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि परिसरात एकच गोंधळ उडाला.

America Accident News
India-America Relations: 'भारतासोबतचे संबंध खराब करु नका...'! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ नितीवरुन अमेरिकन खासदाराने फटकारले

हत्त्येचा आरोप का?

सहसा अशा रस्ते अपघातांमध्ये निष्काळजीपणाने वाहन चालवल्याचा किंवा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जातो. मात्र, हरजिंदर सिंहवर थेट हत्त्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. कायद्याच्या जाणकारांनुसार, जर एखाद्या व्यक्तीचे कृत्य इतके बेजबाबदार आणि धोकादायक असेल की, त्यामुळे दुसऱ्याचा जीव जाण्याची शक्यता आहे, हे माहित असूनही ते कृत्य केले असेल, तर अशा प्रकरणात हत्त्येचा आरोप ठेवला जातो. या प्रकरणातही ट्रक चालकाने महामार्गावर अचानक आणि नियमबाह्य यू-टर्न घेऊन तीन निष्पाप लोकांच्या जीवाला धोका निर्माण केला, म्हणूनच त्याच्यावर हत्त्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले आणि मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने कारमधील तिन्ही व्यक्तींना वाचवता आले नाही.

America Accident News
America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

दुसरीकडे, ही घटना अमेरिकेतील (America) रस्त्यांवर सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित करते. व्हिडिओमध्ये दिसलेली ट्रक चालकाची कृती अत्यंत बेजबाबदार होती आणि त्याचाच परिणाम म्हणून तीन लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अमेरिकेतील कायद्यानुसार, हरजिंदर सिंहला कठोर शिक्षेचा सामना करावा लागू शकतो. पोलिस सध्या या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत आणि लवकरच या प्रकरणी पुढील कारवाई अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com