America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

New York Club Shooting: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात रविवारी (17 ऑगस्ट) पहाटे एका गर्दीच्या क्लबमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली.
New York Club Shooting
America FiringDainik Gomantak
Published on
Updated on

New York Club Shooting: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात रविवारी (17 ऑगस्ट) पहाटे एका क्लबमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. या भयानक घटनेत 3 लोकांचा जागीच मृत्यू झाला असून, 8 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

न्यूयॉर्क पोलीस विभागाच्या आयुक्त जेसिका टिश यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर एक किंवा अधिक असू शकतात, असा तपासकर्त्यांचा अंदाज आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटे सुमारे 3:30 वाजता ब्रुकलिन येथील क्राउन हाइट्स भागातील ‘टेस्ट ऑफ द सिटी लाउंज’मध्ये वादातून हा गोळीबार झाला. हल्लेखोरांनी अनेक शस्त्रांचा वापर करत अंदाधुंद फायरिंग केली.

जेसिका टिश यांनी सांगितले की, न्यूयॉर्क शहरात पुन्हा एकदा गोळीबार झाला. अधिकाऱ्यांना लाउंजमधून 36 बुलेटचे खोके आणि जवळच्या एका गल्लीत एक बंदूक सापडली असून त्याचीही तपासणी सुरु केली आहे. टिश यांच्या मते, गोळीबारात जखमी झालेल्यांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे, ज्यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. 27 ते 61 वयोगटातील हे जखमी लोक आहेत.

New York Club Shooting
America Firing: अमेरिकेतील इंडियानामध्ये बेशुट गोळीबार, हल्लेखोरासह 4 ठार

अमेरिकेतील ‘गन कल्चर’ आणि आकडेवारी

अमेरिकेत (America) गोळीबाराच्या घटना आता सामान्य झाल्या आहेत. अलीकडेच, टेक्सास राज्यातील ऑस्टिन येथेही अशाच एका घटनेत एका बंदूकधाऱ्याने ‘टारगेट’ स्टोअरच्या पार्किंग परिसरात गोळीबार करुन 2 व्यक्तींना आणि एका मुलाला ठार केले होते. आरोपी घटनेनंतर चोरीच्या गाडीतून फरार झाला होता, पण पोलिसांनी त्याला नंतर पकडले.

New York Club Shooting
America Firing: मेक्सिकोच्या सिटी हॉलमध्ये बेशुट गोळीबार, महापौरांसह 18 जण ठार

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 50 वर्षांत ‘गन कल्चर’मुळे अमेरिकेत 15 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेची लोकसंख्या सुमारे 33 कोटी असताना, देशात शस्त्रांची संख्या मात्र 40 कोटींपेक्षा जास्त आहे. अमेरिकेतील कायद्यांनुसार, रायफल किंवा लहान बंदूक खरेदी करण्यासाठी 18 वर्षांची वयोमर्यादा आहे, तर इतर शस्त्रांसाठी 21 वर्षांची वयोमर्यादा आहे. या घटनांमुळे अमेरिकेतील बंदूक नियंत्रणाबाबतचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com