गोव्यात ख्रिश्चन-हिंदू परंपरेचा मिलाप, गणेशाची मनोभावे पूजा; 5 दिवस मांसाहाराचाही त्याग

Ganesh Chaturthi: गोव्यातील काकरा गावात सध्या गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे.
Ganpati
GanpatiDainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Chaturthi: गोव्यातील काकरा गावात सध्या गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. या गावात ख्रिश्चन धर्मातील कॅथलिक पंथ आणि हिंदू प्रथा परंपरा एकमेकांमध्ये समाहित झाल्या आहेत. तज्ञ त्याला 'नव हिंदुत्व' म्हणतात. असो, हिंदू धर्म उदारमतवादी असून तो सर्व पंथीय अनुयायांचा आदर करण्यावर विश्वास ठेवतो.

एका वृत्तसंस्थेची टीम जेव्हा काकरा गावातील रहिवासी संजय परेरा (Sanjay Perera) यांच्या घरी पोहोचली तेव्हा ते 'लेडी ऑफ वेलंकन्नी'च्या मूर्तीसह गणेशाच्या मूर्तीची पूजा करताना दिसले. असे करणारे ते एकटेच नव्हते. या गावात कॅथोलिक वारसा आणि हिंदू चालीरीतींचा अप्रतिम संगम आहे. परेरा म्हणाले की, 'आमच्यासाठी श्रीगणेशाची पूजा आणि वेलंकन्नीची लेडी यांच्यात काही फरक नाही. वेलंकन्नीची लेडी व्हर्जिन मेरीचे एक रुप आहे, ज्याची कॅथोलिक पूजा करतात.'

Ganpati
Dry Fruit Modak Recipe: गणेशजींसाठी बनवा खास सुक्या मेव्याचे मोदक

दरम्यान, गोवा (Goa) सुमारे 50 वर्षांपूर्वी पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला. एका दशकानंतर पणजीजवळील (Panaji) या गावातील लोकांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करुन हिंदू धर्म स्वीकारला. हळूहळू या गावातील लोकांनी आपली कॅथलिक आडनावे बदलून हिंदू नावे ठेवण्यास सुरुवात केली. मात्र ते दोन्ही धर्मांच्या परंपरांचे पालन आणि आदर करतात.

पाच दिवस मासे पकडू नका

परेरा पुढे म्हणाले की, 'गणेशोत्सवात आम्ही पाच दिवस मासेमारी करत नाही. आमच्या गावातील जवळपास प्रत्येक घरात श्रीगणेशाची मूर्ती बसवून पूजा केली जाते.'

Ganpati
Valpoi: गोमंतकीय जनतेला सुखसमृद्धी लाभो, आरोग्‍यमंत्र्यांचे साकडे

प्रत्येक घरात गणेशमूर्ती विराजमान आहेत

संजय परेराप्रमाणेच गणेश परेराही गणेशपूजन करताना दिसले. त्यांनी परेरा हे आडनाव बदलून फातर्पेकर केले आहे. गणेश यांनी सांगितले की, 'आमच्या कुटुंबाने 1971 मध्ये गणेश उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.' 51 वर्षीय फातर्पेकर यांनी हिंदू धर्मात परतलो असल्याची आठवण सांगितली. ते पुढे म्हणाले, 'यानंतर वडील ऑगस्टीन परेरा यांनी गणेश चतुर्थीच्या वेळी घरी गणपतीची मूर्ती आणली. ज्या वर्षी माझ्या वडिलांनी गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली, त्या वर्षाच्या स्मरणार्थ फातर्पेकर यांचे नाव गणेश ठेवण्यात आले. यानंतर प्रत्येक घरात ज्ञान आणि बुद्धी देणाऱ्या गणेशाच्या मूर्ती विराजमान होऊ लागल्या.'

मासेमारी हे उपजीविकेचे साधन

450 लोकसंख्या असलेले काकरा गाव उपजीविकेसाठी मासेमारीवर अवलंबून आहे. गावातील लोकांनी 2010 मध्ये सातेरी रवळनाथाचे मंदिर बांधले. येथे भिंतीवर एक होली क्रॉस देखील आहे. या मंदिरात पूजा केल्यानंतर गावातील लोक मासेमारीसाठी बाहेर पडतात.

Ganpati
Vasco Ganesh Visarjan: वास्कोत दीड दिवसाच्या ‘बाप्पां’चे विसर्जन

जेराम मार्टिन्स होता, आता दत्ता पालकर

काकरा येथील आणखी एक रहिवासी 60 वर्षीय दत्ता पालकर यांनी आपले नाव जेरोम जोस मार्टिन्सवरुन बदलून दत्ता पालकर असे केले. पालकर म्हणाले की, 'अनेकांनी आपली नावे आणि आडनावे बदलली आहेत.' गोव्याचे संशोधक सुनील पालकर यांनी सांगितले की, 'हिंदू संत विनायक महाराज यांनी 1961 मध्ये गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त झाल्यानंतर काकरा, नौक्सिम, चिंबेल, सांताक्रूझ आणि तळेगाव या गावांतील अनेक आदिवासींना हिंदू (Hindu) धर्मात परत आणले.' पालकर पुढे म्हणाले की, 'हिंदू धर्म पुन्हा स्वीकारल्यानंतरही लोकांनी आपल्या जुन्या चालीरीतींचा त्याग केला नाही.'

Ganpati
Ganesh Chaturthi: मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले गणरायाला 'नमन'

तसेच, गोवा विद्यापीठाचे प्राध्यापक रामराव वाघ म्हणाले की, '1960 आणि 70 च्या दशकाच्या उत्तरार्धात अनेक लोकांना 'नव हिंदू' म्हटले जायचे. परेरा, मार्टिन, रोझारियो, डिसोझा, डि'मेलो, कॅब्राल आणि आंद्राडे ही आडनावे या प्रदेशातील गावांमध्ये सामान्य आहेत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com