Ganesh Visarjan
Ganesh VisarjanDainik Gomantak

Vasco Ganesh Visarjan: वास्कोत दीड दिवसाच्या ‘बाप्पां’चे विसर्जन

Vasco: मुरगाव तालुक्यातील दीड दिवसाच्या गणपतींचे उत्साहात विसर्जन करण्यात आले

Mormugao: मुरगाव तालुक्यातील दीड दिवसाच्या गणपतींचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. वास्कोत मिरवणुकीचा धुमधडाका रात्री उशिरापर्यंत सुरू होता. बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात गणरायांचे घरोघरी आगमन झाले. घरोघरी बालगोपाळांपासून वृद्धांपर्यंत आनंद ओसंडून वाहात होता. दुपारी घुमट आरतीचा निनाद दुमदुमत होता. भजन, फुगड्यांनी रात्र जागवली.

Ganesh Visarjan
Ganesh Chaturthi : गोव्यात तरुणाई झाली घुमट आरतीत दंग

गुरुवारी पुन्हा जोमाने आरती, भजने झाल्यानंतर गणपतीला नैवेद्य दाखवून सायंकाळी दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाची तयारी सुरू झाली. गणपती पूजनासाठी पहिल्या दिवशी जशी तयारी करावी लागते, तशीच तयारी गणपती विसर्जनापूर्वी करावी लागते. त्यानुसार प्रत्येक घरात लगबग सुरू होती. उत्तर पूजा केल्यानंतर गणपती विसर्जनाला सुरुवात झाली.

संध्याकाळी आरती झाल्यानंतर रात्री 8 वाजल्यापासून विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. काही जणांनी संध्याकाळी सहा वाजता गणपती विसर्जन केले. रात्री उशिरापर्यंत दिंडीसह मिरवणुका सुरू होत्या. बायणा किनाऱ्यावर खारीवाडा, वाडे तळे येथे शेकडो गणपतींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनस्थळी ‘दृष्टी’ संस्थेचे जीवरक्षक भाविकांकडील गणपती घेऊन खोल समुद्रात विसर्जित करीत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com