

२०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली असून उपांत्य फेरीतील चारही संघ निश्चित झाले आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या संघांनी उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी संमिश्र राहिली असून तीन विजय आणि तीन पराभव त्यांनी नोंदवले आहेत. स्मृती मानधना, प्रतीका रावल आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी फलंदाजीत चमक दाखवली आहे, तर गोलंदाजांनी देखील प्रभावी कामगिरी केली आहे.
इंग्लंड महिला संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघ – २९ ऑक्टोबर, बरसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
ऑस्ट्रेलिया महिला संघ विरुद्ध भारतीय महिला संघ – ३० ऑक्टोबर, डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियम, नवी मुंबई
दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता सुरू होतील, तर नाणेफेक अर्धा तास आधी होईल. उपांत्य सामन्यांतील विजेते संघ २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत आमनेसामने येतील.
भारतीय महिला संघाने यापूर्वी दोनदा विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, मात्र दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
२००५ मध्ये, ऑस्ट्रेलियाकडून ९८ धावांनी पराभव. २०१७ मध्ये, इंग्लंडकडून ९ धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. दोन्ही अंतिम सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व मिताली राजने केले होते.
२०२५ च्या विश्वचषकात भारतीय संघाने आतापर्यंत सहा सामने खेळले, त्यापैकी तीन जिंकले आणि तीन गमावले आहेत. त्यांचा नेट रन रेट +०.६२८ असून ते पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहेत.
संघाचा शेवटचा लीग सामना २६ ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे, ज्यातून संघ अंतिम फेरीपूर्वी आपली गती कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक ठरणार असून, भारतीय महिला संघाच्या ऐतिहासिक विजयानंतरच्या स्वप्नांना पंख मिळतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.