Viral Video: ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या तरुणीसोबत घाणेरडा प्रकार; खाली उभ्या असणाऱ्या तरुणाने केले अश्लील कृत्य, व्हिडिओ व्हायरल!

Girl Harassment Viral Video: रुपाली दीक्षित नावाची तरुणी विवेक एक्सप्रेसमधून प्रवास करत होती. प्रवासादरम्यान ती कोचच्या दरवाजाजवळ उभी असताना, शेजारच्या कोचमधील एका तरुणाने तिच्याकडे पाहून अश्लील आणि आक्षेपार्ह इशारे करण्यास सुरुवात केली.
Girl Harassment Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Girl Harassment Viral Video: प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. सार्वजनिक ठिकाणी महिलांचा सन्मान आणि सुरक्षा राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हे अधोरेखित करणारी एक घटना नुकतीच विवेक एक्सप्रेस ट्रेनमध्ये घडली. या घटनेत एका तरुणीने छेडछाड करणाऱ्या तरुणासमोर न डगमगता धाडस दाखवले, त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि थेट तक्रार नोंदवून एक नवा आदर्श घालून दिला. अनेकदा महिला भीतीपोटी किंवा संकोचामुळे अशा घटनांविरोधात आवाज उठवत नाहीत, मात्र या तरुणीने टाकलेले पाऊल अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

रुपाली दीक्षित नावाची तरुणी विवेक एक्सप्रेसमधून प्रवास करत होती. प्रवासादरम्यान ती कोचच्या दरवाजाजवळ उभी असताना, शेजारच्या कोचमधील एका तरुणाने तिच्याकडे पाहून अश्लील आणि आक्षेपार्ह इशारे करण्यास सुरुवात केली. रुपालीने सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केले, परंतु त्या तरुणाने आपल्या विकृत चाळ्यांची मर्यादा ओलांडली. तिने त्याला विरोध केला, तरीही तो थांबला नाही. अखेर या विकृत तरुणाची ओळख पटावी आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी रुपालीने अत्यंत हुशारीने व धैर्याने त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. व्हिडिओमध्ये तो तरुण कोणत्याही भीतीशिवाय अश्लील चाळे करताना स्पष्ट दिसत आहे.

Girl Harassment Viral Video
Viral Video: चालत्या दुचाकीवरुन हात मारण्याचा पठ्ठ्याचा अघोरी प्रयत्न, नेटकऱ्यांनी सुनावले खडे बोल; म्हणाले, "ही तर अति हावरेपणाची शिक्षा भेटली"

रुपालीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत भारतीय रेल्वे आणि संबंधित उच्च अधिकाऱ्यांना टॅग केले. तिने आपल्या पोस्टमध्ये रेल्वेतील या संतापजनक अनुभवाचा पाढा वाचला. व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासन तातडीने हरकतीत आले. रेल्वेने रुपालीशी संपर्क साधून तिचा पीएनआर क्रमांक, मोबाईल नंबर आणि प्रवासाचा तपशील मागवला, जेणेकरुन तपास वेगाने करता येईल. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने 'रेल मदत' पोर्टलवर या तक्रारीची नोंद करुन घेतली असून तक्रार क्रमांकही जारी केला.

Girl Harassment Viral Video
Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

आरपीएफ इस्टर्न रेल्वेने सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले की, हे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले असून 'आरपीएफ हावडा डिव्हिजन'ला यावर कडक कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Girl Harassment Viral Video
Viral Video: "तुला खोट्या प्रकरणात अडकवेन!" महिला कर्मचाऱ्याची तरुणाला थेट धमकी, पोस्ट ऑफिसमधील हाय व्होल्टेज ड्रामा व्हायरल; नेटकऱ्यांनी घेतला समाचार

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सार्वजनिक ठिकाणी महिलांसोबतचे असे वर्तन अजिबात सहन केले जाऊ नये आणि अशा नराधमांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी युजर्स करत आहेत. या घटनेने समाजात एक स्पष्ट संदेश दिला की, अन्याय सहन करणे हा त्यावरचा उपाय नाही. जर कोणी सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करत असेल, तर घाबरण्याऐवजी त्याच्याविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. महिलांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी रेल्वे आणि सुरक्षा यंत्रणांनी अशा प्रकरणांमध्ये तात्काळ गुन्हेगारांना बेड्या ठोकणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com