Viral Video: चालत्या दुचाकीवरुन हात मारण्याचा पठ्ठ्याचा अघोरी प्रयत्न, नेटकऱ्यांनी सुनावले खडे बोल; म्हणाले, "ही तर अति हावरेपणाची शिक्षा भेटली"

Viral Video Bike Rider Falls Stealing Coconuts: व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की, रस्त्यावरुन एक मालवाहू वैन संथ गतीने जात आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नारळ भरलेले आहेत.
Viral Video Bike Rider Falls Stealing Coconuts
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Viral Video Bike Rider Falls Stealing Coconuts: आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. या फोनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जेव्हा जेव्हा लोकांना रस्त्यावर काही अतरंगी, अजब किंवा चुकीचे घडताना दिसते, तेव्हा लोक लगेचच त्याचा व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. सोशल मीडियावरील हे व्हिडिओ नेटकऱ्यांचे मनोरंजन करतात, तर काही व्हिडिओ विचार करायला प्रवृत्त करतात. सध्या असाच एक मजेशीर आणि डोळे उघडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका दुचाकीस्वाराला धावत्या गाडीतून चोरी करणे भलतेच महागात पडले.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की, रस्त्यावरुन एक मालवाहू व्हॅन संथ गतीने जात आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नारळ भरलेले आहेत. या चालत्या व्हॅनच्या अगदी मागे एक व्यक्ती आपल्या दुचाकीवर येत आहे. व्हॅनचा वेग कमी असल्याचे पाहून त्या व्यक्तीच्या मनात चोरीचा विचार येतो. तो चालत्या बाईकवरुनच हळूच पुढे होतो आणि व्हॅनमधील नारळ बाहेर काढण्याचा प्रयत्न करु लागतो. तो काही नारळ थोडे बाहेर खेचण्यात यशस्वीही होतो, परंतु अनेक नारळ एकमेकांमध्ये अडकलेले असल्यामुळे त्याला ते पूर्णपणे ओढता येत नाहीत. याच प्रयत्नात त्याचा बाईकवरील तोल सुटतो आणि तो थेट रस्त्यावर कोसळतो.

Viral Video Bike Rider Falls Stealing Coconuts
Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

गाडी पडल्यानंतरही तो काही अंतरापर्यंत त्या व्हॅनच्या मागे धावतो, पण अखेर त्याला नारळ सोडून रिकाम्या हाताने आणि अपमानास्पद स्थितीत मागे फिरावे लागते.

Viral Video Bike Rider Falls Stealing Coconuts
Viral Video: गोवा एक्सप्रेसमध्ये गोंधळ! फर्स्ट AC डब्यात थेट जनरलच्या प्रवाशांची गर्दी; महिला प्रवाशाने दाखवलं सत्य, व्हिडिओ व्हायरल

हा संपूर्ण प्रकार पाठीमागून येणाऱ्या एका वाहनचालकाने कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ 'एक्स' वर शेअर करण्यात आला असून, याला एक उपरोधिक कॅप्शनही देण्यात आले. पगार वाढत नसल्याने भाजी चोरण्याचा प्रयत्न केला, पण भाजी तर मिळालीच नाही आणि इज्जतही गेली, असा टोला या कॅप्शनमधून लगावण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) आल्यानंतर युजर्स यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, "भाजीचे माहीत नाही, पण इज्जतीचा रायता नक्कीच झाला."

Viral Video Bike Rider Falls Stealing Coconuts
Viral Video: ओव्हरस्पीडिंगचा थरार! वळणावर नियंत्रण सुटलं अन् तोंड फुटलं, बाईकस्वाराचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही बघितलात का?

दुसऱ्या युजरने "चोरी करणे अत्यंत चुकीचे आहे" असे म्हटले, तर काहींनी "ही तर त्याला अति हावरेपणाची शिक्षा भेटली," अशी प्रतिक्रिया दिली. चोरीच्या नादात दुचाकीचे नुकसान तर झालेच, पण सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने या व्यक्तीची चांगलीच नाचक्की झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com