Viral Video: "तुला खोट्या प्रकरणात अडकवेन!" महिला कर्मचाऱ्याची तरुणाला थेट धमकी, पोस्ट ऑफिसमधील हाय व्होल्टेज ड्रामा व्हायरल; नेटकऱ्यांनी घेतला समाचार

India Post Employee Viral Video: उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार समोर आला.
India Post Employee Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

India Post Employee Viral Video: उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार समोर आला असून, सोशल मीडियावर याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. इंडिया पोस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि एका स्थानिक रहिवाशामध्ये झालेल्या या वादाने आता देशाचे लक्ष वेधून घेतले. या वादादरम्यान एका महिला कर्मचाऱ्याने तरुणाला चक्क "मी मुलगी आहे, तुला खोट्या प्रकरणात अडकवेन!" अशी उघड धमकी दिली.

ही प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली असून यामुळे ऑनलाइन जगतात महिलांना मिळणाऱ्या कायदेशीर संरक्षणाचा गैरवापर करण्याच्या मुद्द्यावरुन मोठी चर्चा सुरु झाली. 'एक्स' वर '@himalayanhindu' नावाच्या हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला.

India Post Employee Viral Video
Viral Video: काय हे वेडेपण! भररस्त्यात दुचाकी चालवताना लॅपटॉपवर काम, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

हा संपूर्ण वाद पिथौरागढ जिल्ह्यातील जरा जिबली गावातील पोस्ट ऑफिसमध्ये सुरु झाला. गावातील एक स्थानिक तरुण पोस्ट ऑफिसमध्ये गेला आणि त्याने तेथील कर्मचाऱ्यांवर गेल्या अनेक महिन्यांपासून गावकऱ्यांचे महत्त्वाचे पार्सल वाटप न केल्याचा थेट आरोप केला. या चौकशीदरम्यान त्याला तिथे पडलेला गावकऱ्यांच्या पार्सलचा एक मोठा बंडल सापडला.

India Post Employee Viral Video
Viral Video: चालत्या ट्रेनमध्ये चढताना तरुणाचा तोल गेला अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी काढले वाभाडे

यावरुन त्याने कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली आणि हे महत्त्वाचे पार्सल वेळेवर का वितरित केले नाही, असा प्रश्न केला. यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गैरवर्तनाचे आरोप केले. महिला कर्मचाऱ्याने आधी "एका मुलीचा व्हिडिओ का काढत आहेस?" असा आक्षेप घेतला आणि नंतर हा वाद अधिकच चिघळला.

India Post Employee Viral Video
Viral Video: रिलचा नाद केला अन् घात झाला! 'त्या' अचानक धडकेनं पोरगी तोंडावर आपटली; व्हिडिओ पाहून नेटकरी लोटपोट

दुसरीकडे, त्या स्थानिक रहिवाशाने आरोप केला की, गावकऱ्यांनी टपाल वितरणातील दिरंगाई आणि पोस्ट ऑफिसमधील अत्यंत खराब सेवेबद्दल वारंवार तक्रारी केल्या, मात्र तरीही अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. यावर पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा बचाव करताना सांगितले की, अनेक नागरिक फोन कॉल्सचे उत्तर देत नाहीत आणि काही टपाल या गावातील लोकांचे नसते. त्यांनी आपल्या कामात निष्काळजीपणा केल्याचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आणि संबंधित तरुणावर बदनामी करण्याचा आरोप केला. परंतु, वादाच्या शेवटी महिला कर्मचाऱ्याने दिलेली धमकी व्हिडिओमध्ये स्पष्ट ऐकू येत आहे.

India Post Employee Viral Video
Viral Video: मृत्यूच्या दाढेत 4 तास! रोलर कोस्टर बंद पडल्यानं 100 फूट उंचीवर अडकली 8 शाळकरी मुलं; 22 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया (Social Media) नेटकऱ्यांनी पोस्ट विभागातील कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केला असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. एका युझरने लिहिले की, अशा अहंकारी कर्मचाऱ्यांना कामावरुन तात्काळ काढून टाकले पाहिजे. तर दुसऱ्या एका युझरने थेट मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि इंडिया पोस्टला टॅग करत, कायदेशीर प्रक्रियेचा असा उघडपणे गैरवापर करणाऱ्या महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली, कारण अशा धमक्यांमुळे वास्तविक पीडित महिलांचा आणि कायद्याचा जनतेमधील विश्वास कमी होतो.

India Post Employee Viral Video
Viral Video: ''पोरींनो दुनियेत कोणालाही डेट करा, पण...'', तरुणीच्या वक्तव्यानं सोशल मीडियावर खळबळ; नेटीझन्सही चक्रावले

काही युझर्सनी विनापरवानगी सरकारी कार्यालयात घुसून असे व्हिडिओ बनवण्यावरही आक्षेप घेतला असून पोस्ट विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com