Fans Criticize Virat : "कोहली तू निकल!!" विराट समोर ट्रोलिंगची कसोटी; करेल का क्रिकेटला कायमचा अलविदा?

Fans upset with Virat Kohli: पर्थ कसोटी सामन्यातील १०० धावांच्या खेळीनंतर विराटने दमदार खेळी करून दाखवलेली नाही
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

Criticism of Virat Kohli on social media

क्रिकेटचा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीवर सध्या टीकांचा वर्षाव होतोय. गेल्या अनेक दिवसांपासून विराट कोहली त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करत नसल्याने चाहते नाराज झाले आहेत. पर्थ कसोटी सामन्यातील १०० धावांच्या खेळीनंतर विराटने दमदार खेळी करून दाखवलेली नाही. ऑस्ट्रेलियाचा धुरंधर खेळाडू जॉश हेझलवूड याने सातव्या ओव्हरमधील दुसरा चेंडू ऑफ-स्टंपच्या टाकला आणि विराटची गडबड उडाली, त्याने हा चेंडू मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला मात्र यांनतर झालेल्या 'कोहली डिप्सर्ट्स' या घोषणेने चाहत्यांची मोठी निराशा झाली.

१६ चेंडूंमध्ये फक्त ३ धावा करून बाद झाल्यानंतर विराट कोहली नक्कीच खुश नाही हे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. कोहली आणि कसोटी सामना यांचा फारच जुना संबंध आहे. कोहली साधारणपणे २०-२२ वर्षांपासून टेस्ट क्रिकेट खेळतोय आणि क्रिकेटमधील बाकी फॉरमॅट्समध्ये उत्तम असलेला विराट टेस्ट क्रिकेटमध्ये आणखीन रंगवून खेळ पुढे नेतो.

Virat Kohli
Virat Kohli: विराटला टीम इंडियातून वगळणार? टी20 वर्ल्डकपसाठी निवड समिती कठोर निर्णय घेण्याची शक्यता

चाहते विराटला टेस्ट क्रिकेटचा नायक समजतात मात्र सध्या त्याचा फॉर्म पाहता टेस्ट सुद्धा त्याच्या पारड्यात काही टाकत नाहीये. क्रिकेटचे चाहते यामुळे बरेच नाराज झाले असून ते सोशल मीडियावर विराटला निवृत्त हो! असं म्हणतायत.

अनेक मिम्सच्या माध्यमातून सध्या किंग कोहलीचं ट्रोलिंग सुरू आहे. काही लोकांनी तर त्याला एमएस धोनी प्रमाणे वेळेत मागे फिर असा इशारा दिलाय. 'विराट कोहलीचे खेळात लक्ष दिसत नाहीय, व्यवस्थापनाने त्याच्याशी बोललं पाहिजे' असं काही चाहते म्हणालेत. 'रोहित किंवा कोहलीशिवाय सुद्धा आम्ही खूप चांगली खेळी करू शकतो, त्यांनी आत्तापर्यंत खूप मोठी कामगिरी बजावली पण आता त्यांनी खेळ सोडून द्यावा' असा रोष चाहते व्यक्त करतायत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com