गोमन्तक डिजिटल टीम
भारताचा स्टार खेळाडू आणि क्रिकेटचा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीच्या कारकिर्दीत 23ऑक्टोबर फारच महत्वाचा आहे, आणि देश विदेशात असलेले विराटचे चाहते आजचा दिवस विसरू शकत नाही.
भारतात क्रिकेट हा एक धर्मच मानला जातो आणि त्यात जर का एखादा सामना भारत आणि पाकिस्तानमध्ये असेल तर चाहत्यांची उत्सुकता शेगला पोहोचते. 2022 मध्ये झालेल्या T-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आजच्या दिवशी विराटने एक दमदार कामगिरी बजावत भारताला जिंकवून दिलं होतं.
त्या मॅचमध्ये विराटने हरिस रौफला मारलेली सिक्सर एवढी गाजली की पुढे ICCने या धुवाधार सिक्सरला 'शॉट ऑफ द सेंच्युरी' असं नाव देऊन टाकलं.
त्यादिवशी मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या खेळात भारताला जिंकण्यासाठी केवळ 8 बॉलमध्ये 28 धावांची गरज होती.
रौफची आक्रमक बॉलिंग स्टाईल त्या दिवशी टीम इंडियावर भारी पडत असताना विराटने त्याच्या एकाच ओव्हरमध्ये दोन सिक्सर मारले, यानंतर आपण जिंकू शकतो अशी आशा टीम इंडियाच्या खेम्यात पल्लवीत झाली.
पाकिस्तानच्याविरुद्ध टीम इंडिया पराभूतच होऊ शकत नाही, अशी खात्री भारतीय चाहत्यांनी होती. किंग कोहलीने भारताला पराभूत होण्यापासून वाचवलंय आणि त्या दिवशी 52 चेंडूतील 83 धावांची नाबाद खेळी अफलातून होती.
विराटच्या त्या खेळीचं स्वतः हारिसने तोंडभरुन कौतुक केलं होतं. तो म्हणाला की, विराटशिवाय दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला हा शॉट जमलाच नसता. त्यादिवशी विराटशिवाय आणखीन कोणी मला हरवलं असतं मी नक्कीच दुःखी झालो असतो मात्र तो विराट आहे आणि त्याची शैलीच काही और आहे.