Venezuela Earthquake: व्हेनेझुएलात भूकंपाचा महातांडव! 235 मृत्यू, 39 हजार नागरिक बेपत्ता; ढिगाऱ्याखालून येताहेत किंकाळ्या

Venezuela Massive Earthquake: दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशात बुधवारी रात्री काही मिनिटांच्या अंतराने आलेल्या 7.2 आणि 7.5 तीव्रतेच्या दोन विनाशकारी भूकंपांनी मोठी हानी केली.
Venezuela Massive Earthquake
Venezuela EarthquakeDainik Gomantak
Published on
Updated on

Venezuela Massive Earthquake: दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशात बुधवारी रात्री काही मिनिटांच्या अंतराने आलेल्या 7.2 आणि 7.5 तीव्रतेच्या दोन विनाशकारी भूकंपांनी मोठी हानी केली. या भीषण नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 235 लोकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती असून, तब्बल 39000 लोक अजूनही बेपत्ता आहेत. शेकडो नागरिक गंभीर जखमी झाले असून ढिगाऱ्याखालून मदतीसाठी येणारे आवाज ऐकून बचावकार्य अधिक वेगाने केले जात आहे.

मात्र, ढिगाऱ्याखाली दबलेल्यांची संख्या मोठी असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. राजधानी काराकस येथील देशातील मुख्य विमानतळ या भूकंपामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, यामुळे आपत्तीग्रस्त भागात तातडीने मदत पोहोचवण्याच्या मार्गात मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या इतिहासात एका शतकाहून अधिक काळातील हा सर्वात शक्तिशाली आणि भयानक भूकंप मानला जात आहे.

Venezuela Massive Earthquake
Venezuela Earthquake: काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश! भीषण भूकंपानं व्हेनेझुएला उद्ध्वस्त; 10 हजार मृत्यूंची भीती VIDEO

भूकंपानंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये कंक्रीटच्या ढिगाऱ्याखामधून धूळ आणि रक्ताने माखलेली लहान मुले, नागरिक आणि पाळीव प्राण्यांना बाहेर काढतानाचे थरारक दृश्य दिसत आहे. अनेक इमारती पत्त्यांसारख्या कोसळल्या असून हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या संकटसमयी अमेरिकेत राहणाऱ्या व्हेनेझुएलाच्या नागरिकांनी गुरुवारी एकत्र येत मदतीसाठी मोठे 'डोनेशन ड्राईव्ह' सुरु केले. 1995 मध्ये व्हेनेझुएला सोडून अमेरिकेत स्थायिक झालेले सेल्स मॅनेजर टोरेस यांनी सांगितले की, डोराल येथील स्थानिक ग्रुप्स तातडीने पैसे, औषधे, पाणी आणि अत्यावश्यक वस्तू गोळा करत असून पहिली खेप लवकरच रवाना केली जाईल.

Venezuela Massive Earthquake
America Attack Venezuela: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हवाई हल्ला ; संरक्षणमंत्र्यांचे घर अन् लष्करी तळाला केलं लक्ष्य Watch Video

सध्या व्हेनेझुएलामध्ये जखमींवर उपचारासाठी फर्स्ट एड आणि वैद्यकीय साहित्याची प्रचंड टंचाई भासत आहे. यामध्ये प्रामुख्याने गॉझ, बँडेज, अँटीसेप्टिक क्रीम, डिस्पोजेबल ग्लोव्हज, फेस मास्क, सिरिंज, थर्मामीटर आणि ब्लड प्रेशर मॉनिटर यांसारख्या गोष्टींची मोठी मागणी आहे. भूकंपामध्ये वाचलेल्या नागरिकांनी सांगितले की, इमारतींमधून बाहेर पडताना झालेल्या धावपळीत अनेक जण जखमी झाले.

Venezuela Massive Earthquake
America Attack Venezuela: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हवाई हल्ला ; संरक्षणमंत्र्यांचे घर अन् लष्करी तळाला केलं लक्ष्य Watch Video

एका मॅरीटाईम कन्सल्टंटने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, या भूकंपात (Earthquake) त्यांनी आपले सर्वस्व गमावले. हजारो लोक आपल्या बेपत्ता नातेवाईकांच्या शोधासाठी आणि त्यांच्या माहितीसाठी आशेने ढिगाऱ्यांकडे डोळे लावून बसले आहेत. संपूर्ण देशात सध्या अत्यंत चिंताजनक आणि वेदनादायी परिस्थिती निर्माण झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com