Venezuela Earthquake: काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश! भीषण भूकंपानं व्हेनेझुएला उद्ध्वस्त; 10 हजार मृत्यूंची भीती VIDEO

Venezuela Earthquake Video: दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशात गुरुवारी (25 जून) सकाळी निसर्गाचा अत्यंत भीषण आणि थरारक तांडव पाहायला मिळाला.
Venezuela Earthquake Video
Venezuela EarthquakeDainik Gomantak
Published on
Updated on

Venezuela Earthquake Video: दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशात गुरुवारी (25 जून) सकाळी निसर्गाचा अत्यंत भीषण आणि थरारक तांडव पाहायला मिळाला. अवघ्या 40 सेकंदांच्या अंतराने आलेल्या दोन लागोपाठच्या शक्तिशाली भूकंपांनी संपूर्ण देशाला हादरवून सोडले. रिश्टर स्केलवर 7.2 आणि 7.5 तीव्रतेच्या या विनाशकारी भूकंपांमुळे लाखो लोकांचे छत्र एका क्षणात हिरावले.

या भूकंपाचे केंद्र राजधानी काराकासच्या पश्चिमेकडील मोंटालबान आणि मोरोन भागात असल्याचे 'युएस जिओलॉजिकल सर्व्हे'ने स्पष्ट केले. भूकंपाचा पहिला धक्का 7.1 ते 7.2 तीव्रतेचा होता, तर त्यानंतर लगेचच 7.5 तीव्रतेचा दुसरा महाभयानक धक्का बसला. या अस्मानी संकटामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती पाहता व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांनी देशभरात आणीबाणी (Emergency) घोषित केली. या आपत्तीमध्ये आतापर्यंत जवळपास 10000 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Venezuela Earthquake Video
Benjamin Netanyahu vs Donald Trump: ट्रम्प यांना त्यांच्याच भाषेत उत्तर! 'आम्ही कोणाच्या इशाऱ्यावर चालत नाही'; नेतन्याहूंचा थेट पलटवार VIDEO

राजधानी काराकाससह देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये बहुमजली इमारती पत्त्यांसारख्या कोसळल्या. सिमोन बोलिव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या छताचा एक मोठा भाग कोसळल्यामुळे विमानतळ तातडीने बंद करण्यात आले. या मुख्य धक्क्यांनंतर 20 हून अधिक आफ्टरशॉक्स (भूकंपाचे छोटे धक्के) जाणवले असून, त्यामुळे नागरिकांमधील भीती आणखी वाढली. भूकंपामुळे देशातील वीज आणि दळणवळण यंत्रणा पूर्णपणे कोलमडली.

Venezuela Earthquake Video
Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

अनेक शहरे अंधारात बुडाली असून इंटरनेट सेवा ठप्प झाल्यामुळे लोकांना एकमेकांशी संपर्क साधणे कठीण झाले आहे. ला ग्वायरा आणि वॉलेसिया या शहरांमधील निवासी इमारती, हॉटेल्स आणि सरकारी कार्यालयांचे मोठे नुकसान झाले. या भूकंपाचे (Earthquake) तीव्र झटके शेजारील देश कोलंबियाची राजधानी बोगोटापर्यंत जाणवले.

Venezuela Earthquake Video
Donald Trump: "मी राष्ट्राध्यक्ष व्हावं असं त्याला वाटत नव्हतं..." अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या एपस्टीनसोबतच्या मैत्रीवर ट्रम्प बोलले

सोशल मीडियावर या भूकंपाचे अत्यंत हृदयद्रावक आणि अंगावर काटा आणणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये मोठ्या इमारती सेकंदात जमिनीदोस्त होताना आणि हवेत धुळीचे प्रचंड साम्राज्य पसरताना दिसत आहे. रस्त्यांवर काँक्रीटचे मोठे तुकडे आणि लोहाच्या सळ्या पडल्या असून संपूर्ण रस्त्यावर चिखल पाहायला मिळत आहे. लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना कडेवर घेऊन जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावणाऱ्या लोकांचा आक्रोश आणि किंकाळ्यांनी काराकासच्या रस्त्यांवर एकच घबराट निर्माण केली. व्हेनेझुएलाच्या इतिहासातील हा अत्यंत वेदनादायी आणि भयानक भूकंप ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Trump Signs Sanctioning Russia & Iran Act 2026
World Highest Paid PM Salary Singapore
Pentagon Polygraph Test US Joint Staff Military Leak
Zimbabwe Boat Accident Kariba Lake
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com