Umesh Pal Murder Case: चॅटने केला मोठा खुलासा, 'या' वकिलाने असद अहमदला पाठवला होता उमेश पालचा फोटो; अन्...

Umesh Pal Murder Case: उमेश पाल हत्या प्रकरणात वकील खान सौलत हनिफची भूमिकाही समोर आली आहे.
Asad Ahmed
Asad Ahmed Dainik Gomantak
Published on
Updated on

Umesh Pal Murder Case: उमेश पाल हत्या प्रकरणात आता वकील खान सौलत हनिफ यांची भूमिकाही समोर आली आहे.

चकमकीत मारला गेलेला अतीक अहमदचा मुलगा असद आणि वकील खान सौलत हनिफ यांचे मोबाईल चॅट्स समोर आले आहे.

अतीकचे वकील खान सौलत हनिफ यांनी उमेश पाल यांचा फोटो अतीकचा मुलगा असद याला पाठवला होता. 19 फेब्रुवारी रोजी त्यांनी अनेक फोटो पाठवले होते.

दरम्यान, असदने उमेश पाल यांचे तेच फोटो शूटर्संना पाठवले होते. त्यानंतर 24 फेब्रुवारीला उमेश पाल यांची हत्या करण्यात आली. उमेश पाल हत्या प्रकरणात आता अतिकचे वकील हनीफ यांनाही पोलिसांनी (Police) आरोपी बनवले आहे. पाल यांच्या अपहरण प्रकरणात सौलत हनिफ यांना यापूर्वीच जन्मठेपेची शिक्षा झाली असून ते नैनी कारागृहात बंद आहेत.

Asad Ahmed
Umesh Pal Murder Accused: उमेश पाल हत्या प्रकरणात मोठे यश, नाशिकमध्ये पकडला गेला गुड्डू मुस्लिम

दुसरीकडे, शनिवारी अतीक आणि अश्रफची हत्या झाली. त्यानंतर यूपी पोलिस अतीकच्या गॅंगमागे हात धुवून मागले.

यातच, अतीकचा मुलगा असदही एन्काउंटरमध्ये मारला गेला. तुरुंगात असलेल्या अतिकच्या दोन्ही मुलांच्या वागण्यातही बदल झाला असून पोलिसांपासून वाचण्यासाठी अतिकच्या गॅंगमधील पोरांनी आपले मोबाईल फोन बंद केले आहेत.

लखनऊ तुरुंगात उमरच्या वागण्यात बदल झाला

अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येनंतर लखनऊ तुरुंगात बंद असलेल्या उमरची देहबोली बदलली आहे. असदच्या एन्काउंटरची बातमी उमर अहमदला मिळताच तो अचानक बॅरेकमध्ये गुडघ्यावर बसला आणि अल्लाहाकडे प्रार्थना करु लागला.

दुसरीकडे, अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येची खबर रविवारी त्याला मिळाली. त्याने लगेच विचारले की, हत्या कोणी केली? ते पकडले गेले का?

Asad Ahmed
Umesh Pal Case: उमेश पाल हत्याकांडातील कॉन्स्टेबल हत्येचा व्हिडिओ समोर, बॉम्बस्फोट झाला अन्...

अलीने खाणेपिणे बंद केले, तब्येत बिघडली

अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येनंतर मुलगा उमर एका झटक्यात बदलला पण त्याचा दुसरा मुलगा अलीचा दृष्टिकोन त्याच्या मोठ्या भावापेक्षा पूर्णपणे वेगळा होता.

वडील अतिक अहमद आणि काका अश्रफ यांच्या मृत्यूनंतर अलीने तुरुंगात खाणेपिणे सोडून दिले. त्यानंतर, अलीला रात्रीतच रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शाइस्ताच्या शोधात छापेमारी सुरुच आहे

त्याचवेळी, उमेश पाल हत्याकांडातील आरोपी शाइस्ता परवीनचा यूपी पोलीस कसून शोध घेत आहेत. प्रयागराज (Prayagraj) ते कौशांबीपर्यंत पोलीस शाइस्ताचा शोध घेत आहेत.

200 हून अधिक घरांची झडती घेण्यात आली आहे. संशयाच्या आधारे दोन डझनहून अधिक महिलांची चौकशी केली, मात्र शाइस्ता सापडली नाही. अतिकच्या काही नातेवाईकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Asad Ahmed
Atiq Ahmed Murder Case: कुठे आहे आतिकची पत्नी आणि गुड्डू मुस्लिम? यूपी एसटीएफने सांगितला अॅक्शन प्लॅन

उमेश पाल हत्या प्रकरणापूर्वी 19 फेब्रुवारीला शाइस्ता परवीन सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली होती. उमेश पाल हत्याकांडात सहभागी असलेला शूटर साबीरही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला होता.

साबीरवर पाच लाख आणि शाइस्तावर 50 हजारांचे बक्षीस आहे. अतिक अहमदचा राइट हॅंड समजला जाणारा असद कालिया यालाही अटक करण्यात आली आहे.

आयेशा नूरी आणि जैनब याही फरार आहेत

पाच प्रकरणात वॉन्टेड असदवर 50 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. अशा स्थितीत लवकरच शाइस्तापर्यंत पोहोचेल असा विश्वास पोलिसांना आहे.

शाइस्ताशिवाय पोलीस अतीक अहमदची बहीण आयेशा नूरी आणि अतीकचा भाऊ अश्रफची पत्नी झैनब फातिमा यांचाही शोध घेत आहेत. उमेश पाल हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही आरोपी बनवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com