Udaipur Murder Case: तीन आरोपींना पोलीस कोठडी, चौघांची तुरुंगात रवानगी

उदयपूरमधील कन्हैयालालच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या सात आरोपींना मंगळवारी एनआयए कोर्टात हजर करण्यात आले.
Accused
AccusedDainik Gomantak

Udaipur Murder Case: उदयपूरमधील कन्हैयालालच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या सात आरोपींना मंगळवारी एनआयए कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान, रिमांडची मुदत संपल्यानंतर अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींना मंगळवारी एनआयए कोर्ट, जयपूरमध्ये हजर करण्यात आले. तिन्ही आरोपींना 12 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर इतर चौघांना एक ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, 28 जून रोजी मुहम्मद रियाझ अख्तारी आणि गौस मुहम्मद यांनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीचे समर्थन करण्यासाठी टेलर कन्हैया लालची हत्या केली. त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये म्हटले की, 'इस्लामच्या अपमानाचा बदला घेतला आहे'.

Accused
Udaipur Murder Case: कन्हैया लाल हत्येतील आरोपींची NIA कोठडी रवानगी

दुसरीकडे, अख्तारी, गौस, मोहसीन, आसिफ, मोहम्मद मोहसीन, वसीम अली आणि फरहाद मोहम्मद शेख यांच्यासह सात आरोपींना (Accused) कडेकोट बंदोबस्तात मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष सरकारी वकील टीपी शर्मा यांनी सांगितले की, न्यायालयाने अख्तारी, घौस आणि शेख यांची एनआयए (NIA) कोठडीत आणि इतर चौघांना न्यायालयीन कोठडीत पाठवले.

तसेच, मुख्य आरोपी अख्तारी आणि गौस यांच्याशिवाय इतरांना कटात सहभागी असल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली. सर्व आरोपींवर UAPA अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. यापूर्वी त्यांना 12 जुलैपर्यंत एनआयए कोठडीत पाठवण्यात आले होते.

Accused
Amravati Murder Case: अमरावती हत्याकांडाचा मास्टरमाइंड गजाआड

दुसरीकडे, एनआयएच्या पथकाने मंगळवारी उदयपूर शहरातील मुखर्जी चौक परिसरात संभाव्य संशयितांच्या घरांची झडती घेतली. या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांनी सांगितले की, 'टीमने तीन-चार जणांनाही ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.'

शिवाय, गुन्ह्यानंतर पोस्ट केलेल्या त्यांच्या व्हिडिओमध्ये, अख्तारी आणि गौस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही धमकी दिली होती. कट्टरतावादाचा प्रचार करणाऱ्या दावत-ए-इस्लामी या कराचीस्थित धार्मिक संघटनेशी असलेल्या संबंधाबाबत त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे.

Accused
Udaipur Murder Case: उदयपूर हत्याकांडावर UN चे मोठे वक्तव्य, बोलली ही मोठी गोष्ट

याशिवाय, केंद्रीय एजन्सी सोशल मीडियावरील माहिती आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कशी त्यांचे कनेक्शनसाठी सर्व आरोपींचे फोन आणि इतर साहित्य देखील तपासत आहे. उदयपूर हत्येव्यतिरिक्त, NIA महाराष्ट्रातील (Maharashtra) अमरावती जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या एका केमिस्टच्या हत्येचाही तपास करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com