Amravati Murder Case: अमरावती हत्याकांडाचा मास्टरमाइंड गजाआड

महाराष्ट्रातील अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येतील मास्टरमाइंडला पोलिसांनी नागपुरातून अटक केली आहे.
Umesh Kolhe
Umesh KolheDainik Gomantak
Published on
Updated on

Amravati Chemist Killing: महाराष्ट्रातील अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांच्या हत्येतील मास्टरमाइंडला पोलिसांनी नागपुरातून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इरफान खान असून तो नागपुरातील एका एनजीओचा मालक आहे. यासोबतच केमिस्ट उमेश कोल्हे खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असणाऱ्या इरफानने हत्येचा संपूर्ण प्लान तयार केल्याचे पोलिसांनी सांगितले. इतर आरोपींना खुनासाठी प्रवृत्त करण्याचे कामही इरफान खानने केले. (Amravati Murder Case Mastermind Irfan Khan Arrested From Nagpur)

दरम्यान, 21 जून रोजी महाराष्ट्रातील (Maharashtra) अमरावती शहरात 54 वर्षीय केमिस्टची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. फेसबुकवर नुपूर शर्मांच्या (Nupur Sharma) समर्थनार्थ पोस्ट लिहिल्याने ही निर्घृण हत्या महाराष्ट्रात घडल्याचा पोलिसांना संशय आहे. ते अमरावतीमधील (Amravati) अमित मेडिकल स्टोअर नावाने केमिस्टचे दुकान चालवत होते.

Umesh Kolhe
Udaipur Murder Case: कन्हैया लाल हत्येतील आरोपींची NIA कोठडी रवानगी

तसेच, कोल्हे हे दुकान बंद करुन दुचाकीवरुन घरी जात असताना रात्री 10 ते 10.30 च्या दरम्यान ही घटना घडली. त्यांचा मुलगा साकेत (27) आणि पत्नी वैष्णवी हे त्यांच्यासोबत वेगळ्या वाहनाने गेले. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने शनिवारी सांगितले की, राष्ट्रीय तपास संस्था (NIA) हत्येचा तपास करेल. 21 जून रोजी झालेल्या उमेश कोल्हे यांच्या हत्येमागील कटाचा तपास एनआयए करणार असल्याचे प्रवक्त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

Umesh Kolhe
Udaipur Murder Case: उदयपूर हत्याकांडावर UN चे मोठे वक्तव्य, बोलली ही मोठी गोष्ट

प्रवक्त्याने सांगितले की, 'एनआयए आंतरराष्ट्रीय संबंधांच्या सहभागाची देखील कसून चौकशी करते. या प्रकरणातील सूत्रधाराच्या अटकेसह आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com