Congress News: सेवादलाचे दिल्लीतील कार्यालय काँग्रेस करणार रिकामे, आदेश जारी

सेवा दलाचे हे कार्यालय दिल्लीतील 26 अकबर रोडवर आहे.
Sonia Gandhi
Sonia GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

Congress News: काँग्रेसला सेवादलाचे कार्यालय रिकामे करावे लागणार आहे. राज्य संचालनालयाने काँग्रेसला (Congress) सेवादलाचे कार्यालय रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. सेवा दलाचे हे कार्यालय नवी दिल्लीतील 26 अकबर रोड येथे आहे.

Sonia Gandhi
"RSS भाजपचं इंस्‍ट्रुमेंट बनलयं", अरुण शौरींनी मोदी सरकारवर साधला निशाणा

सेवादलाचे कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित होणार

पंडित दीनदयन मार्गावर काँग्रेसला नवीन जागा देण्यात आली आहे, तिथे बांधकाम सुरु आहे. कोरोनामुळे नवीन इमारतीचे बांधकाम थांबवावे लागल्याने सेवादलाचे कार्यालय रिकामे करण्यासाठी दिलेली मुदत वारंवार वाढवण्यात आली होती. नवीन इमारतीचे काम अद्याप अपूर्ण आहे. सध्या सेवादलाचे कार्यालय 5 रायसीना मार्गावरील एनएसयूआयच्या कार्यालयात स्थलांतरित करण्यात येणार आहे.

दिल्लीत काँग्रेसच्या तीन इमारती

सध्या दिल्लीत काँग्रेसच्या तीन इमारती आहेत. काँग्रेसचे मुख्यालय 24, अकबर रोड इथे असून सेवा दलाचे कार्यालय 26, अकबर रोड इथे आहे. याशिवाय तिसरी इमारत 5 रायसीना मार्गावर आहे, जिथे एनएसयूआयचे कार्यालय आहे.

Sonia Gandhi
‘नवे कृषी धोरण आणा, अन्यथा...’; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारला दिला अल्टिमेटम

काँग्रेसची सर्व कार्यालये स्थलांतरित केली जाणार

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंडित दीनदयन मार्गावर बांधण्यात येत असलेल्या नवीन इमारतीत काँग्रेसची सर्व कार्यालये स्थलांतरित केली जाणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस स्थलांतराचे काम पूर्ण होईल. नवीन इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
7000 Students Tested Positive HIV
Priyanka Gandhi Attack PM Modi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com