"RSS भाजपचं इंस्‍ट्रुमेंट बनलयं", अरुण शौरींनी मोदी सरकारवर साधला निशाणा

माजी केंद्रीय मंत्री आणि पत्रकार अरुण शौरी (Arun Shourie) यांनी 'द कमिशनर फॉर लॉस कॉज' या नवीन पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने माध्यमाशी संवाद साधला.
Arun Shourie
Arun ShourieDainik Gomantak
Published on
Updated on

माजी केंद्रीय मंत्री आणि पत्रकार अरुण शौरी (Arun Shourie) यांनी 'द कमिशनर फॉर लॉस कॉज' या नवीन पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने माध्यमाशी संवाद साधला. शौरींनी 583 पानांचे हे पुस्तक लिहिले आहे. यावेळी केंद्र सरकारवर निशाणा साधण्यासोबतच शौरी यांनी भारतीय राजकारणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर आपले मत उघडपणे मांडले. अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असलेले शौरी म्हणाले, “आजकाल गलिच्छ राजकारण सुरु झालं आहे. घटनात्मक संस्था डबघाईला येत आहेत. संस्था आणि एजन्सी सत्तेच्या हातातील कठपुतळी बनल्या तर हे थांबवता येणार नाही.

दरम्यान, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन शौरी म्हणाले की, ‘भ्रष्टाचार आज संस्थात्मक झाला आहे. एका अग्रगण्य वृत्तपत्रात नुकतीच बातमी आली होती की, एका फर्मने शपथपत्र दाखल केले की, तुम्ही निवडणूक बाँड न घेतल्यास तुम्हाला गोवण्यात येईल.’

Arun Shourie
‘नवे कृषी धोरण आणा, अन्यथा...’; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारला दिला अल्टिमेटम

ते पुढे म्हणाले की, ‘’आज परिस्थिती अशी आहे की, केंद्र सरकारच्या अनेक संस्था महाराष्ट्रातील नेत्यांच्या विरोधात कारवाया करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) हे आज भाजपचे इंस्‍ट्रुमेंट बनले आहे, हा एक मोठा बदल झाला आहे.’’ कर्नाटकातील हिजाब वाद आणि उद्या होणाऱ्या रामनवमी मिरवणुकीला जबाबदार कोण, या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘ध्रुवीकरण हे सत्ताधारी पक्षाच्या प्रचारातील एक साधन आहे,’ असे दिसते. यातून विरोधकांना काय मिळणार? त्यानंतर उदाहरण देताना ते म्हणाले की, 'लव्ह जिहाद' चा मुद्दा यूपीत आला, त्याची तारीख बघा, कशी आली? सत्ताधारी पक्षाचे ध्रुवीकरण करण्याचे हे तंत्र आहे.’

Arun Shourie
'देश के आर्थिक शत्रुओं पर रहमदिली...': वरुण गांधींनी मोदी सरकारला दिला घरचा आहेर

आम आदमी पक्षाचा उदय आणि अरविंद केजरीवाल यांची वाढती स्थिती :

पंजाब जिंकल्यानंतर केजरीवाल यांना महत्त्व द्यायला हवे. या प्रश्नावर शौरी म्हणाले - ‘जो जिंकत आहे, त्याला महत्त्व दिले पाहिजे.’ शौरी यांनी खुलासा करताना सांगितले की, ‘नरेंद्र मोदींना आम आदमी पक्षाच्या वाढत्या महत्त्वाचा अंदाज होता.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com