एबीव्हीपी, जायन्ट किलर आणि... कोण आहेत तेलंगणातील मुख्यमंत्री पदाचे दावेदार Revanth Reddy?

Telangana: रेवंत रेड्डी 2006 मध्ये पहिल्यांदा अपक्ष म्हणून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणून आले. यानंतर, 2007 मध्ये, आंध्र प्रदेश विधान परिषदेत अपक्ष म्हणून निवडणून आले होते.
Revanth Reddy|Congress|Telangana
Revanth Reddy|Congress|TelanganaDainik Gomantak
Published on
Updated on

Who is the Revanth Reddy? The contender for the post of Chief Minister of Telangana:

चार राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल येऊ लागले आहेत. विधानसभा निवडणुका झालेल्या राज्यांमध्ये तेलंगणा हे एकमेव दक्षिणेकडील राज्य आहे. येथील एक्झिट पोलबद्दल बोलायचे तर बहुतांश एजन्सींनी काँग्रेसचे सरकार स्थापनेचे संकेत दिले होते.

आणि हा अंदाज निकालात रुपांतरित होत आहे. कर्नाटकानंतर आणखी एका दक्षिणेकडील राज्यात काँग्रेसची सत्ता येत आहे. राज्यात काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाची कमान कोणाकडे सोपवली जाणार, याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता आहे.

अशा स्थितीत तेलंगणात काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी येणाऱ्या चेहऱ्यांमध्ये सर्वात मोठे नाव प्रदेशाध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांचा आहे.

कोण आहेत ए. रेवंत रेड्डी?

तेलंगणात मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून सर्वात मोठे दावेदार म्हणून ज्या नावाची चर्चा आहे ते म्हणजे रेवंत रेड्डी. सध्या रेवंत रेड्डी यांच्याकडे तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद आहे.

त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1967 रोजी अविभाजित आंध्र प्रदेशातील कोंडारेड्डी पल्ली, नगरकुर्नूल येथे झाला. रेवंत यांच्या वडिलांचे नाव अनुमुला नरसिंह रेड्डी आणि आईचे नाव अनुमुला रामचंद्रम्मा आहे.

त्यांनी हैदराबाद येथे ए.व्ही. कॉलेज (उस्मानिया विद्यापीठ) मधून ललित कला शाखेत पदवीचे शिक्षण घेतले. यानंतर रेवंत यांनी छापखान्याचा व्यवसाय सुरू केला.

लग्नानंतर सुरू झाला राजकीय प्रवास

7 मे 1992 रोजी रेवंत यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री जयपाल रेड्डी यांची भाची अनुमुला गीता यांच्याशी लग्न केले.

मात्र, सुरुवातीला करिअरच्या निवडीमुळे कुटुंबातील सदस्य या नात्याला विरोध करत होते. नंतर घरच्यांनी होकार दिला आणि त्याने गीतासोबत वैवाहिक संबंध सुरू केले. त्यांना न्यामायशा नावाची मुलगी आहे.

लग्नानंतर काँग्रेस खासदार रेवंत यांचा राजकीय प्रवास सुरू होतो, ज्याची कहाणीही रंजक आहे. विद्यार्थीदशेतच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या आरएसएसच्या विद्यार्थी संघटनेशी संबंधित होते.

2006 मध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि मिडझिल मंडळातून जिल्हा परिषद प्रादेशिक समितीचे सदस्य म्हणून निवडून आले.

Revanth Reddy|Congress|Telangana
Goa Congress: काँग्रेसला सापडला होता उमेदवार पण...

अपक्ष असूनही जिंकली विधानपरिषद

2007 मध्ये रेवंत यांनी अपक्ष असतानाही जादू करत आंध्र प्रदेश विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडणून आले.

या कार्यकाळात ते तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांच्या जवळ गेले आणि अखेरीस ते पक्षाचा एक भाग बनले.

जायंन्ट किलर

2009 मध्ये, रेवंत यांनी टीडीपीच्या तिकिटावर आपली पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि 6,989 मतांनी विजय मिळवला. कोडंगल मतदारसंघातून निवडणूक लढवलेले रेवंत पाच वेळा काँग्रेसचे आमदार गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव करून पहिल्यांदाच आमदार झाले.

तेलंगणाच्या स्थापनेपूर्वी 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत, रेवंत पुन्हा एकदा कोडंगल मतदारसंघातून टीडीपीचे उमेदवार होते. पुन्हा एकदा त्यांनी यावेळी टीआरएसचे उमेदवार असलेल्या गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव केला.

कॉंग्रेस प्रवेश

2014 च्या विधानसभा निवडणुकीत रेवंत यांनी 14,614 मतांनी विजय मिळवला होता. यानंतर टीडीपीने रेवंत यांना तेलंगणा विधानसभेचे नेते बनवले. तथापि, 25 ऑक्टोबर 2017 रोजी टीडीपीने रेवंत यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना पदावरून काढून टाकले. शेवटी, 31 ऑक्टोबर 2017 रोजी, रेवंत काँग्रेसचे सदस्य झाले.

Revanth Reddy|Congress|Telangana
''माझ्या मुलीला कधीपण फाशी देतील...'', निमिषाला वाचवण्यासाठी या कारणामुळे आई जाऊ शकणार नाही येमेनला!

पराभवानंतर झेप

2018 च्या विधानसभा निवडणुकीत रेवंत यांचा पराभव झाला. पराभवानंतर रेवंत यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावले. 2019 च्या निवडणुकीत जिंकलेल्या तेलंगणातील काँग्रेसच्या तीन लोकसभा खासदारांपैकी रेवंत एक होते.

मलकाजगिरी मतदारसंघातून काँग्रेसच्या रेवंत यांनी टीआरएसच्या एम राजशेखर रेड्डी यांचा 10 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.

रेवंत यांना जून २०२१ मध्ये मोठी जबाबदारी मिळाली, जेव्हा काँग्रेसने त्यांना तेलंगणा राज्य युनिटचे अध्यक्ष केले.

या विधानसभा निवडणुकीत रेवंत यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विरोधात निवडणूक लढवली. सिद्धीपेट जिल्ह्यातील गजवेल विधानसभा जागेवर ही लढत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com