Telangana Elections: तेलंगणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून होणाऱ्या बेकायदेशीर दारूच्या तस्करीबाबत रायलसीमा भागातील पोलीस, उत्पादन शुल्क आणि विशेष अंमलबजावणी खाते (SEB) यांना सतर्क करण्यात आले आहे.
गोवा आणि सीमावर्ती भागातील अनेक बेकायदेशीर डिस्टिलरीज सध्या तेलंगणामध्ये किराणा माल आणि इतर वस्तूंची वाहतूक केली जात आहे.
तेलंगणा राज्यात प्रवेश करण्यासाठी या वाहनांना आंध्र प्रदेशच्या अनंतपूर आणि कुरनूल जिल्ह्यातून जावे लागते. या जिल्ह्यांतील अनेक नेते गोव्यातून अवैध मद्य वाहतुकीत गुंतले असल्याचा संशय व्यक्त केला जातो.
वैध मार्गाने येणारे मद्यच नाही तर गोव्यातील अनधिकृत डिस्टिलरीजमधून अवैध मद्यही राज्यात येण्याची शक्यता वाढली आहे, अशी माहिती रायलसीमा क्षेत्राच्या उत्पादन शुल्क टास्क फोर्सच्या एका माजी अधिकार्याने स्थानिक वृत्तपत्राला दिली.
परराज्यांतून ड्युटी न भरलेल्या दारूची संभाव्य तस्करीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागांना सतर्क करण्यात आले आहे. गुंटकल एक्साईज (SEB) विंग आणि पोलिसांनी काही वर्षांपूर्वी अशा टोळीचा पर्दाफाश केला होता.
गोव्याजवळील एका उत्पादन युनिटने बिस्किटांच्या डब्यांच्या खाली बनावट दारूची वाहतूक केल्याचे एक प्रकरण समोर आले होते. या टोळीने एपी ब्रँडच्या बनावट लेबल लावून ड्युटी न भरलेली मद्य वाहतूक केली होती.
आंध्र प्रदेशच्या तुलनेत तेलंगणामध्ये दारूच्या किमती कमी असल्या तरी, गोव्यातील उत्पादन युनिटमधून शुल्क न भरलेल्या मद्याची अवैध वाहतूक रायलसीमा प्रदेशातून तेलंगणाच्या महबूबनगरला होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गोव्याच्या सीमेवरून अवैध मद्य राज्यात येण्याची शक्यता असलेल्या सर्व चेक पोस्टवर नजर ठेवली जात आहे, असे उत्पादन शुल्क आणि विशेष अंमलबजावणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.