Election Results: लोकसभेच्या सेमी फायनलमध्ये भाजप 'सुसाट', तीन राज्यांमध्ये बाजी

Assembly Election Results 2023: 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल मानल्या जाणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये भाजपने बाजी मारली आहे. यातील राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. तर कॉंग्रेसने तेलंगणामध्ये कॉंग्रेसने बीआरएस ची 10 वर्षांची सत्ता उलथवली आहे.
BJP
BJPDainik Gomantak

बीआरएस कडून कॉंग्रेसचे अभिनंदन

बीआरएसला सलग दोन वेळा सत्ता दिल्याबद्दल तेलंगणातील जनतेचे आभार. आजच्या निकालाबद्दल दु: खी नाही, परंतु निश्चितपणे निराश झालो कारण तो आमच्यासाठी अपेक्षित नव्हता. पण आम्ही हे आमच्या वाटचालीत एक धडा म्हणून घेऊ आणि परत येऊ. जनादेश जिंकल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे अभिनंदन.

बीआरएस नेते केटीआर

दिल्लीतील भाजप मुख्यालयात जल्लोष

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय होत आहे. या निमित्तानाने दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पक्षाचे कार्यकर्ते मोठा जल्लोष साजरा करत आहेत.

भाजपचा जोर वाढला

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार दुपारी 12 वाजेपर्यंत मध्य प्रदेशमध्ये भाजप 162 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 65 जागांवर पुढे आहे.

राजस्थानमध्ये भाजप 112 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 72 जागांवर तर बसपा ३ जागांवर पुढे आहे.

छत्तीसगडमध्ये भाजप 53 जागांवर तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे.

तेलंगणामध्ये काँग्रेस 63 जागांवर आघाडीवर असून, बीआरएस 42 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 9 जागांवर आघाडीवर आहे. तर AIMIM 4 जागेवर आघाडी मिळाली आहे.

भाजपची आघाडी कायम

सकाळी 12 वाजेपर्यंतच्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेशमध्ये भाजप 156 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 71 जागांवर पुढे आहे.

राजस्थानमध्ये भाजप 116 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस ६७ जागांवर तर बसपा ३ जागांवर पुढे आहे.

छत्तीसगडमध्ये भाजप 44 जागांवर तर काँग्रेस 41 जागांवर आघाडीवर आहे.

तेलंगणामध्ये काँग्रेस 61 जागांवर आघाडीवर असून, बीआरएस 36 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे. तर AIMIM एका जागेवर आघाडी मिळाली आहे.

राजस्थानात सत्ताविरोधी कल

राजस्थानात जनतेने सत्ताधाऱ्यांविरोधात कल दिल्याचे दिसत आहे. यात विरोधी पक्ष 106 जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी कॉंग्रेस 69 जागांवर पुढे आहे. यात अपक्ष 3 जागांवर लढत देत आहेत.

मध्य प्रदेशात भाजपचे वादळ

मध्य प्रदेशात भाजपने 150 जागांवर मोठी आघाडी घेतली आहे. तर कॉंग्रेस 69 जागांवर अडकली आहे. 3 जागांवर इतारांनी लीड घेतली आहे.

छत्तीसगडमध्ये चुरस कायम

छत्तीसगडमध्ये भाजप 43 जागांवर पुढे असला तरी कॉंग्रेसही 39 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे येथे काय होणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

बीआरएस दहा वर्षांनंतर गमावणार सत्ता

तेलंगणामध्ये कॉंग्रेसने तब्बल 58 जागांवर आघाडी घेतली असून सत्ताधारी बीआरएस 33 जागांवर पुढे आहे. तर भाजप 7 जागांवर चांगली टक्कर देत आहे.

शिवराज सिंहांची मोठी आघाडी

मध्य प्रदेशातील बुधनी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान तब्बल 21 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

राजस्थानमध्ये भाजपचा जल्लोष सुरू 

राजस्थानमधील भाजपच्या गोटात आनंदाची लाट उसळली असून, कार्यकर्त्यांनी आतापासूनच संभाव्य विजयाचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली आहे.

छत्तीसगडमध्ये 7 मंत्री पिछाडीवर

छत्तीसगडमध्ये भाजप मोठी आघाडी घेताना दिसत आहे. अशात कॉंग्रेस सरकारमधील मंत्री पिछाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

छत्तीसगडमध्ये भाजपला आघाडी

चुरशीच्या लढतीत छत्तीसगडमध्ये भाजपने 48 जागांवर आघाडी घेतली आहे. तर, कॉंग्रेस अवघ्या 40 जागांवर पुढे आहे.

गहलोत यांची जादूगरी चालेना

राजस्थानमध्ये कॉंग्रेस फक्त 81 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे गहलोत यांची जादू चालत नसल्याचे दिसत आहे. दुसरीकडे भाजपने 107 जागांवर आघाडी मिळवली आहे.

मध्य प्रदेशात भाजपची मुसंडी

मध्य प्रदेशात भाजपने मुसंडी मारत 150 जागांवर आघाडी घेतली आहे. तर कॉंग्रेस 74 जागांवर पुढे आहे.

तेलंगणात चुरस वाढली

सुरुवातील मोठ्या फरकाने पिछाडीवर पडलेल्या बीआरएसने पुन्हा एकदा मुसंडी मारत कॉंग्रेसच्या 61 जांगांमधील फरक कमी करत 50 जागांवर आघाडी मिळवली आहे. दुसरीकडे भाजप 5 आणि एमआयएम 4 जागांवर आघाडी घेतली आहे.

छत्तीसगड

अनपेक्षितपणे छत्तीसगडमध्येही कॉंग्रेस आणि भाजपमध्ये चुरस असून, कॉंग्रसने 49 तर भाजपने 40 जागांवर आघाडी मिळवली आहे.

राजस्थान

राजस्थानात भाजप 105 जागांवर पुढे आहे. तर कॉंग्रेसने 80 जगांवर आघाडी मिळवली आहे. सोबतच 14 अपक्षही आघाडीवर आहेत.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशात पुन्हा एकदा भाजपने 133 जागांवर आघाडी घेतली आहे. तर कॉंग्रेस 93 व अपक्ष 4 जागांवर आघाडीवर आहेत.

तेलंगणा

तेलंगणामध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस 60, बीआरएस 35, भाजप 5 आणि एमआयएम 4 जागांवर आघाडीवर आहे.

मध्य प्रदेश, राजस्थानात भाजपकडे 'मॅजिक फिगर'

मध्य प्रदेशात भाजपने 115 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर कॉंग्रेस 90 जागांवर पुढे आहे. दुसरीकडे राजस्थानातही भाजपने 104 जागांवर आघाडी घेत मॅजिक फिगर गाठली आहे. येथे कॉंग्रेस 80 जागांवर पुढे आहे.

मध्य प्रदेशात 'कांटे की टक्कर'

मध्य प्रदेशात सरळ लढतीत दोन्ही राष्ट्रीय पक्ष जोरदार लढत देत आहेत. दरम्यान कॉंग्रेसने 92 जागांवर लढत घेतली आहे. तर भाजप 90 जागांवर पुढे आहे.

छत्तीसगडमध्येही कॉंग्रेसने गाठला बहुमताचा आकडा

तेलंगणा पाठोपाठ कॉंग्रेसने छत्तीसगडमध्येही 46 जागांवर आघाडी घेत बहुमताचा आकडा गाठला आहे. दरम्यान भाजपने 25 जागांवर आघाडी मिळवले आहे.

तेलंगणात कॉंग्रेसने गाठली 'मॅजिक फिगर'

कॉंग्रेसने बहुमताचा आकडा गाठत 60 जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी बीआरएस 33 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान यामध्ये भाजप 3, एमआयएम 2 आणि इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत.

छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसने भाजपला पछाडले

सुरुवातील आघाडीवर असलेल्या भाजपला मागे टाकत छत्तीगडमध्ये कॉंग्रेसने 35 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 30 जागांवर आघाडीवर आहे.

तेलंगणात सत्ताधारी बीआरएस पिछाडीवर

तेलंगाणात सत्ताधारी बीआरएसला मोठा धक्का बसत आहे. येथ कॉंग्रेसने 50 जागांवर आघाडी घेतली असून, बीआरएस 27 जागांवर आघाडीवर आहे.

राजस्थानात कॉंग्रेस-भाजपमध्ये टाय 

राजस्थानात जवळपास 10 जांगांनी आघाडीवर असलेल्या भाजपला कॉंग्रेसने गाठले असून, जागांमधील अंतर कमी केले आहे. सध्या दोन्ही पक्ष प्रत्येकी 50 जागांवर आघाडीवर आहेत.

राजस्थानमध्ये दिग्गज आघाडीवर

मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आघाडी घेतली आहे.

"शिवराज सिंह चौहान यांचे 'अच्छे दिन' संपणार"

मध्य प्रदेश: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणतात, "...मी हे आधीही बोललो होतो आणि आजही सांगतो की, आम्ही 130 पेक्षा अधिक जागा जिंकणार आहोत.."

विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याबद्दल ते म्हणतात, "फक्त त्यांचा निरोप निश्चित नाही तर त्यांचे 'अच्छे दिन' देखील संपणार आहेत."

मध्य प्रदेशात चुरस

Summary

मध्य प्रदेशात दोन्ही राष्ट्रीय पक्ष कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात बरोबरी झाली असून, दोन्ही पक्ष प्रत्येकी 45 जागांवर आघाडीवर.

तेलंगणात कॉंग्रेस पुढे

Summary

अत्यंत चुरशीच्या लढतीत तेलंगणामध्ये कॉंग्रेस 15 आणि बीआरएस 12 जांगांवर पुढे आहे.

मध्य प्रदेशात बरोबरी

मध्य प्रदेशात मतमोजणीला सुरुवात होताच कॉंग्रेस आणि भाजपने प्रत्येकी 18 जागांवर आघाडी घेतली आहे.

काँग्रेस समर्थक हनुमानाच्या वेषात

मतमोजणी सुरू होण्यापूर्वी काँग्रेस समर्थक नवी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर जमले आहेत. यादरम्यान एक समर्थक हनुमानाच्या वेशात आला आणि म्हणाला की, सत्याचा विजय होईल.

राजस्थानमध्ये भाजप आशावादी

राजस्थान: "भाजपने निवडणूक प्रचारासाठी आपली पूर्ण ताकद लावली आहे. मी म्हणू शकतो की निर्णय देखील भाजपच्या बाजूने असेल. लोकांना दुहेरी इंजिन सरकार आणि विकास हवा आहे... मी आशावादी आहे. की उद्या राजस्थानमध्ये भाजपची सत्ता येईल."

-केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

"भाजपचे 'तांडव' संपणार"

मध्य प्रदेश: मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी मध्य प्रदेश काँग्रेसचे युवा नेते जितू पटवारी म्हणाले, "...भाजपने लोकशाहीच्या प्रतिष्ठेला फाटा देत ज्या प्रकारचे 'तांडव' निर्माण केले होते, ते आता संपणार आहे. देशाने आमदारांचा बाजार पाहिला आहे. या सर्व परिस्थितीत महागाई, बेरोजगारी, रोगराईच्या वेदनांनी जनता ग्रासली होती. त्यांनी देशात जी अराजकता निर्माण केली आहे ती आता संपणार आहे..."

छत्तीसगडमध्ये विजयाचा भाजपचा दावा

छत्तीसगड: 90 सदस्यीय छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. दरम्यान, भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंह म्हणाले "भाजप राज्यात स्पष्ट बहुमताने सरकार बनवेल. आम्ही राज्यात 42-55 जागा मिळवू."

तेलंगणात झळकले कॉंग्रेसच्या विजयाचे पोस्टर

तेलंगणा: काँग्रेस राज्य विधानसभा निवडणूक जिंकेल आणि ९ डिसेंबरला कॉंग्रेस सरकार स्थापन करेल अशा आशयाचे पोस्टर तेलंगणा कॉंग्रेस कार्यालयाबाहेर झळकत आहेत.

तीन राज्यांत भाजप आघाडीवर, तेलंगणात कॉंग्रेस सरकार पक्कं

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये भाजपने मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढत असून तेलंगणामध्ये काँग्रेस प्रचंड बहुमताने विजयी होताना दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com