आझमगड विषारी दारु प्रकरणात अडकले सपा नेते रमाकांत यादव

सपा नेत्याच्या घरात आढळली बनावट दारू; आरोपीला अटक
Azamgarh Liquor Tragedy
Azamgarh Liquor TragedyDainik Gomantak
Published on
Updated on

यूपीच्या आझमगड (Azamgarh) विषारी दारू प्रकरणात (Hooch Tragedy) माजी खासदार आणि समाजवादी पक्षाचे नेते रमाकांत यादव यांचे नातेवाईक रंगेश यादव यांना पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली आहे. रंगेश यादव याच्या दारुच्या ठेक्यावरुन ही भेसळयुक्त दारु जप्त करण्यात आली. सरकारी कंत्राटाच्या नावाखाली रंगेश यादव कथित बनावट दारुचा व्यवसाय करायचा. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून 7 आरोपींना गजाआड टाकले आहे. तसेच रंगेश यादवसह सात जणांविरुद्ध खूनाच गुन्हा पोलिसांकडून दाखल करण्यात आला आहे.

Azamgarh Liquor Tragedy
निकालापूर्वीच गोव्यात भाजप-काँग्रेसची बहुमतासाठी धावपळ सुरु; भेटी-गाठींना वेग

दरम्यान, रमाकांत यादव यांच्यावर विषारी दारुकांडातील आरोपी रंगेश यादव याला घरात आश्रय दिल्याचा आरोप आहे. मात्र, निवडणुकीच्या (Assembly Election) वेळी आपल्याविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचे रमाकांत यादव यांचे म्हटले आहे. रमाकांत यादव हे फुलपूर पवई विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार आहेत. या प्रकरणात रमाकांत यादवचाही सहभाग असल्याचे पोलिसांकडून प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी छापे टाकून आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे. सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करताना एनएसए अंतर्गत कारवाई केली जाईल, असे डीएम अमृत त्रिपाठी यांनी सांगितले.

Azamgarh Liquor Tragedy
भारतीयांना युक्रेनमधून आणण्यासाठी एअर इंडियाचं उड्डाण

41 जणांची प्रकृती खालावली

विशेष म्हणजे जिल्ह्यातील अहरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी शासकीय ठेक्याची दारू पिणाऱ्या पाच जणांचा मृत्यू झाला. इतर 41 जणांची प्रकृती खालावली असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 6 जणांची प्रकृती चिंताजनक असून ते डायलिसिसवर आहेत. या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे सांगितले आहे. यासोबतच उत्पादन शुल्क विभागाच्या तीन अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. डीएम त्रिपाठी यांनी सांगितले की, झब्बू, रामकरण, रामप्रीत यादव, संतोष आणि शमीम अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com