युक्रेन आणि रशिया(Russia-Ukraine Conflict) दरम्यान सुरू असलेले संकट शिगेला पोहोचले आहे. दरम्यान, भारत सरकारने युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. भारताने आजपासून भारत-युक्रेन दरम्यान तीन उड्डाणे करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर दोन उड्डाणे 24 आणि 26 फेब्रुवारीला होणार आहेत. एअर इंडियाने (Air India) ट्विट केले की 22, 24 आणि 26 फेब्रुवारी 2022 रोजी भारत-युक्रेन 3 उड्डाणे करणार आहे, एअर इंडियाचे बुकिंग ऑफिस, वेबसाइट, कॉल सेंटर आणि अधिकृत ट्रॅव्हल एजंट्सच्या माध्यमातून सुरू होणार आहे.
यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाकडून एक सूचनाही जारी करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या सुचनेमध्ये असे म्हटले आहे की, "युक्रेनमध्ये सतत वाढत जाणारा तणाव आणि परिस्थितीची अनिश्चितता लक्षात घेता अतिरिक्त उड्डाणांची व्यवस्था करण्यात आली आहे. 25 फेब्रुवारीला खीव ते दिल्ली सकाळी 7 वाजता, 27 फेब्रुवारीला सकाळी 7 आणि संध्याकाळी 7.35 वाजता अतिरिक्त उड्डाणे केली जातील."
फ्लाइट पर्याय उपलब्ध बदल शक्य
परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्लागार सुचनेत असे सांगण्यात आले आहे की एअर अरेबिया, फ्लाय दुबई, कतर एअरवेज इत्यादी विमान कंपन्या युक्रेन ते दिल्ली पर्यंत उड्डाण करणार आहेत. तिकीट बुकिंगसाठी या कंपन्यांच्या कार्यालयातून तसेच त्यांच्या वेबसाइट्स, कॉल सेंटर्स आणि अधिकृत ट्रॅव्हल एजंट्सद्वारे बुक करता येते. परराष्ट्र मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले आहे की अधिक उड्डाण पर्याय उपलब्ध असल्यास सल्लागारात बदल केला जाऊ शकतो.
विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर अपडेट राहण्याचा सल्ला
याबाबत भारतीय दूतावास सुचनेत विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर अपडेट राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. युक्रेनमधील परिस्थितीबाबत सतत उच्च पातळीचा तणाव आणि अनिश्चितता लक्षात घेता सर्व भारतीय विद्यार्थ्यांना तात्पुरते युक्रेन सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय विद्यार्थ्यांना चार्टर फ्लाइट्सच्या अपडेट्ससाठी संबंधित विद्यार्थी कॉन्ट्रॅक्टर्सच्या संपर्कात राहण्याचा आणि कोणत्याही अपडेटसाठी दूतावासाच्या फेसबुक, वेबसाइट आणि ट्विटरला फॉलो करत राहण्याचा सल्ला दिला जातो आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.