निकालापूर्वीच गोव्यात भाजप-काँग्रेसची बहुमतासाठी धावपळ सुरु; भेटी-गाठींना वेग

गोव्या कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नाही, अशी अटकळ बांधली जात आहे.
BJP Goa
BJP GoaTwitter/@BJP4Goa
Published on
Updated on

पणजी: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी गोव्यात (Goa Election 2022) राजकीय खळबळ उडाली आहे. यावेळी येथे कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नाही, अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे आतापासून काँग्रेस (Congresss) आणि भाजपच्या (BJP) नेत्यांनी अपक्ष उमेदवारांना आपल्या बाजूने आणण्यासाठी संपर्क सुरू केला आहे. गोवा विधानसभेत एकूण 40 जागा आहेत. म्हणजेच सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला येथे 21 जागांची आवश्यकता आहे. 10 मार्चला गोवा विधानसभा निवडणूकिचा निकाल लागणार आहे.

मात्र, सध्या भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष मीडियासमोर आपल्या विजयाचा दावा करत आहेत. न्यू इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, 'आम्हाला जास्तीत जास्त जागा मिळण्याचा विश्वास आहे. आमच्या उमेदवारांचाही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गोव्यातील जनतेने परिवर्तनाच्या बाजूने कौल दिला आहे. जर आमच्याकडे संख्या कमी असेल तर आम्ही निश्चितपणे समविचारी आणि धर्मनिरपेक्ष विजेत्यांची मदत घेऊ.'

BJP Goa
खाणलुटीची वसुली ऐच्छिक नव्हे!

अपक्षांसह काँग्रेसला साथ देण्याचा विश्वास

अपक्ष उमेदवारांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ते सर्वजण भाजपच्या विरोधात लढले. सरकार बनवण्यासाठी आणि चालवण्यासाठी आम्हाला सर्वांचा पाठिंबा हवा आहे. काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो सर्व जनतेचा पाठिंबा घेऊन कोणत्याही अडचणीशिवाय गोव्यात सरकार चालवेल, असा दावा चोडणकर यांनी केला आहे.

BJP Goa
खाण भागातील विद्यार्थ्यांची परवड संपता-सपेना!

भाजपचा दावा

भाजपच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, 'भाजप एकमेव पक्ष आहेत जो कमी संख्याबळ असले तरी गोव्यात सरकार स्थापन करू शकतात. 2017 मध्ये काँग्रेस 17 जागांसह सर्वात मोठा पक्ष होता, तर भाजपला 13 जागा मिळाल्या होत्या. मात्र जेव्हा भाजपला सरकार बनवण्याचे सांगण्यात आले तेव्हा सर्व लहान पक्षांनी पाठिंबा दिला. भाजप हा एकमेव पक्ष आहे जो गोव्यात स्थिर सरकार आणू शकतो. गोवा हे छोटे राज्य असून त्याला केंद्राच्या मदतीची गरज आहे. केंद्रात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे राज्यातही भाजपने सरकार स्थापन केल्यास गोव्यातील जनतेचे भले होईल.' गोव्याच्या इतिहासानुसार सरकार स्थापनेत छोटे पक्ष आणि अपक्षांचा मोठा वाटा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com