भाजपविरोधात सर्वांनी एकत्र या, विरोधी पक्षांच्या बैठकीत सोनिया गांधींचे आवाहन

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) बोलावलेल्या या बैठकीला काँग्रेससह 19 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
Sonia Gandhi requests all oppositions to come together against BJP
Sonia Gandhi requests all oppositions to come together against BJPDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा (Congress President) सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी शुक्रवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत भाजपविरोधात (BJP) एकत्र येण्याचे आवाहन केले अहे .या बैठकीत त्यांनी विरोधी पक्षांनी केवळ संसदेतच (Parliament) नव्हे तर बाहेरही एकत्र आले पाहिजे असे माथी मांडले आहे.तसेच त्या म्हणाल्या की, 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये, आपल्या देशाला स्वातंत्र्य चळवळीच्या मूल्यांवर आणि आपल्या संविधानाच्या तत्त्वांवर आणि तरतुदींवर विश्वास ठेवणारे सरकार देण्याच्या उद्देशाने आपल्याला नियोजन करावे लागेल. त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. (Sonia Gandhi requests all oppositions to come together against BJP)

सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षांनी बोलावलेल्या या बैठकीला काँग्रेससह 19 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.

ऑनलाईन झालेल्या या बैठकीत देशातील एकूण 19 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. डीएमकेचे एमके स्टालिन, टीएमसीच्या ममता बॅनर्जी, जेएमएमचे हेमंत सोरेन, राष्ट्रवादीचे शरद पवार, लोकतांत्रिक जनता दलाचे शरद यादव आणि माकपचे सीताराम येचुरी उपस्थित होते या नेत्यांचा या बैठकीत समावेश होता.

Sonia Gandhi requests all oppositions to come together against BJP
योगींच्या मंत्रीमंडळाचा होणार विस्तार

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी यावर बोलताना , 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि आगामी राज्य निवडणुकांसह अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा केली जाईल.अशी माहिती दिली होती. आज होणाऱ्या या बैठकीसंदर्भात आधीच सांगण्यात आले होते की, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांसह 18 विरोधी पक्षांचे नेते सहभागी होतील पण दिल्लीची सत्ताधारी आम आदमी पार्टी (आप) सहभागी होणार नाही. याशिवाय शिरोमणी अकाली दलालाही बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलेले नव्हते.

बैठकीला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत - "समविचारी विरोधी पक्षांची बैठक आज सोनिया गांधींच्या पुढाकाराने संपन्न झाली. आज झालेल्या या बैठकीत भाग घेतला आणि आपले विचार व्यक्त केले. "ते म्हणाले," सध्याचे सरकार हे सर्व प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. जे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवतात, ज्यांना आपल्या देशाच्या लोकशाही तत्त्वांना वाचवण्यासाठी एकत्र काम करायचे आहे, त्यांनी एकत्र यावे, हाच माझा आग्रह आहे. ”

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com