Shubhanshu Shukla Axiom-4 Mission: मेरे कंधो पर तिरंगा है! शुभांशू शुल्का यांनी अंतराळातून देशवासीयांसाठी पाठवला पहिला संदेश; Watch Video

Shubhanshu Shukla Message: ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा अंतराळातून पहिला संदेश दिलाय
Shubhanshu Shukla video
Shubhanshu Shukla videoDainik Gomantak
Published on
Updated on

Shubhanshu Shukla Space Mission: भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. भारतीय हवाई दलाचे अधिकारी शुभांशु शुक्ला यांनी बुधवार (२५ जून ) रोजी दुपारी १२ वाजून १ मिनिटांनी अंतराळात झेप घेऊन नवा इतिहास रचलाय. शुभांशु यांनी अमेरिकेतील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून 'अॅक्सिओम-४' (Axiom-4) मिशनअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे यशस्वी उड्डाण केले.

अंतराळातून पहिला संदेश

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा अंतराळातून पहिला संदेश दिलाय. ते म्हणतात "नमस्कार मेरे प्यारे देशवासियां. काफी साल बाद हम फिर वापस अंतरीक्ष में पूछेंच गए हैं. कमाल की सवारी थी. मेरे साथ मेरे कांदे पे तिरंगा है..." शेवटी "जय हिंद, जय भारत" असं म्हणत त्यांनी देशाप्रती अभिमान व्यक्त केलाय.

राकेश शर्मानंतर ४१ वर्षांनी भारताला नवा मान

या मिशनसोबत शुभांशु शुक्ला हे राकेश शर्मानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले आहेत. राकेश शर्मा यांनी ३ एप्रिल १९८४ रोजी सोव्हिएत युनियनच्या मदतीने अंतराळ प्रवास केला होता. त्यांच्या या ऐतिहासिक प्रवासानंतर तब्बल ४१ वर्षांनी, शुभांशु शुक्ला यांच्या रूपाने भारताला पुन्हा एकदा अंतराळात मानवी उपस्थितीचा अभिमान मिळाला आहे.

स्पेसएक्सच्या रॉकेटमधून 'ड्रॅगन'मध्ये प्रवास

शुभांशु हे चार सदस्यीय क्रूचा भाग आहेत, जे स्पेसएक्सच्या फाल्कन-९ (SpaceX Falcon 9) रॉकेटद्वारे ड्रॅगन स्पेसक्राफ्टमध्ये (Dragon Spacecraft) बसून आयएसएसकडे रवाना झालेत. 'अॅक्सिओम-४' मोहीम तांत्रिक अडचणींमुळे अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती, पण मोठ्या प्रतीक्षेनंतर आज ती नियोजित वेळेत यशस्वीपणे प्रक्षेपित झाली.

लखनऊचे शुभांशु शुक्ला: हवाई दलातील अनुभवी अधिकारी

मूळचे लखनऊ, उत्तर प्रदेशचे असलेले शुभांशु शुक्ला हे भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन पदावर कार्यरत आहेत. त्यांची ही निवड एका वर्षाच्या कठोर प्रशिक्षणानंतर झाली होती, ज्यामुळे त्यांची अंतराळ प्रवासाची तयारी परिपूर्ण झाली होती. ते इस्रोच्या महत्त्वाकांक्षी 'गगनयान' मोहिमेचाही एक महत्त्वाचा भाग आहेत, जी भारताची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहीम आहे.

Shubhanshu Shukla video
Goa News: भोम येथील स्थानिकांनी महामार्ग रुंदीकरणाबद्दल व्यक्त केली चिंता; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

त्यांनी सुखोई-३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, जॅग्वार, हॉक अशा विविध विमानांचा २,००० तासांचा उड्डाण अनुभव घेतला आहे. या मोहिमेमुळे, मानवी अंतराळ संशोधनात भारताच्या प्रगतीमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून देशभरातून त्यांना कौतुकाची थाप देण्यात येतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com