Katy Perry In Space: ब्लू ओरिजिनने महिला अंतराळ पथकासह रचला इतिहास, प्रसिद्ध गायिका केटी पेरीने पाच महिलांसह केली अंतराळाची सैर

जेफ बेझोस यांची कंपनी ब्लू ओरिजिनने पुन्हा एकदा इतिहास रचला. लॉरेन सांचेझ यांनी महिला सेलिब्रेटी क्रूसह ब्लू ओरिजिनच्या यानातून अंतराळ प्रवास केला.
Katy Perry
Katy PerryDainik Gomantak
Published on
Updated on

जेफ बेझोस यांची कंपनी ब्लू ओरिजिनने पुन्हा एकदा इतिहास रचला. लॉरेन सांचेझ यांनी महिला सेलिब्रेटी क्रूसह ब्लू ओरिजिनच्या यानातून अंतराळ प्रवास केला. या चमूमध्ये प्रसिद्ध गायिका केटी पेरी आणि 'सीबीएस मॉर्निंग'च्या होस्ट गेल किंग सारख्या सेलिब्रेटींचाही समावेश होता. हे उड्डाण अंतराळ पर्यटनाचा एक भाग होते, जिथे आता श्रीमंत आणि प्रसिद्ध लोक सहजपणे अंतराळात प्रवास करु शकतील.

न्यू शेपर्ड रॉकेटने वेस्ट टेक्सास येथून उड्डाण केले

दरम्यान, ब्लू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड रॉकेटने वेस्ट टेक्सास येथून उड्डाण केले. रॉकेट सुमारे 105 किलोमीटर उंचीवर पोहोचले, जिथे प्रवाशांना काही मिनिटांसाठी गुरुत्वाकर्षणाचा अनुभव आला नाही. हे 10 मिनिटांचे पूर्णपणे स्वयंचलित उड्डाण होते. लॉरेन सांचेझ या स्वतः एक हेलिकॉप्टर पायलट आणि टीव्ही पत्रकार आहेत. या प्रवासासाठी त्यांनी खास या महिला चमूची निवड केली होती. त्यांच्यासोबत चित्रपट निर्मात्या कॅरियन फ्लिन, नासाच्या माजी अभियंता आयशा बोवे आणि शास्त्रज्ञ अमांडा गुयेन याही होत्या.

सर्व प्रवासी महिला

दुसरीकडे, हे विमान देखील खास होते. अंतराळ प्रवास करणाऱ्या सर्व प्रवासी महिला होत्या. 64 वर्षांच्या अंतराळ प्रवासाच्या इतिहासात महिला क्रू अंतराळात जाण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, 1963 मध्ये सोव्हिएत अंतराळवीर व्हॅलेंटिना तेरेशकोवा एकट्या अंतराळात गेल्या होत्या. आजही अंतराळवीरांमध्ये महिलांचे प्रमाण केवळ 15 टक्के आहे. लॉरेन यांनी या विमान प्रवासासाठी खासकरुन महिलांची निवड केली. या निवडीमागचा उद्देश हा तरुण आणि वृद्धांना मोठे स्वप्न पाहण्यास प्रेरित करण्याचा होता. यासाठी त्यांनी खास फ्लाइट सूट देखील डिझाइन केले होते.

मानवता आणि महिलांसाठी एक मोठे पाऊल

तसेच, केटी पेरी यांनी या उड्डाणाला मानवता आणि महिलांसाठी एक मोठे पाऊल असल्याचे म्हटले. पेरी म्हणाल्या की, 'वाणिज्यिक अंतराळ प्रवासाच्या भविष्यासाठी हा एक खास क्षण आहे.' ओप्रा विन्फ्रे सारख्या सेलिब्रेटी देखील लॉन्चिंग पाहण्यासाठी टेक्सासमध्ये पोहोचल्या होत्या. दुसरीकडे, ब्लू ओरिजिनचे हे 11 वे मानवी अंतराळ उड्डाण होते. जेफ बेझोस यांनी 2000 मध्ये ही कंपनी सुरु केली. 2021 मध्ये त्यांनी स्वतः ब्लू ओरिजिनच्या पहिल्या उड्डाणातून अंतराळाची सैर केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com