Co-working spaces Goa: वर्फ फ्रॉम गोवा बीच; राज्य सरकार लवकरच सुरु करणार को-वर्किंग स्पेसेस

Co-working spaces Goa:गोव्यातील मारजी आणि आश्वे समुद्रकिनाऱ्यांवर यासाठी को-वर्किंग स्पेसेस तयार केल जातील, असे पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
Co-working spaces Goa | Work From Beach
Co-working spaces Goa | Work From Beach

Co-working spaces Goa

वर्क फ्रॉम होमच्या धर्तीवर गोवा सरकार वर्क फ्रॉम बीचची संकल्पना राबविण्याचा विचार करत आहे. यासाठी राज्यात विविध समुद्र किनाऱ्यालगत को-वर्किंग स्पेसेस सुरु करण्याचा विचार आहे.

गोव्यातील मारजी आणि आश्वे समुद्रकिनाऱ्यांवर यासाठी को-वर्किंग स्पेसेस तयार केल जातील, असे पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

आयटीबी, बर्लिन येथे झालेल्या एका कार्यक्रमात गोवा राज्य पर्यटन विभागाचे सचिव संजीव आहुजा यांनी याबाबत भाष्य केले आहे. राज्य सरकार गोवा पर्यटनाचा केवळ समुद्रकिनारे याच्या पलिकडे करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे, आहुजा म्हणाले. ट्रॅव्हल ट्रेडवर आधारीत हा कार्यक्रम पाच मार्चपासून बर्लिन येथे सुरु झाला आहे.

युरोप आणि अधिक खर्च करणारे पर्यटकांना आकर्षित करणे आणि पर्यटन क्षेत्रातील सर्व अनुभूती देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यटकांना राज्यात येण्यासाठी इतर कारण देखील मिळावे, असा पर्यटन विभागाचा मानस असल्याचे त्यांनी नमूद केले.

Co-working spaces Goa | Work From Beach
Mangesh Temple Goa: पार्वतीसोबत वाद झाला अन् महादेवाने हिमालय सोडला, गोव्यातील मंगेशी संबधित स्कंदपुराणातील कथा काय?

मंत्री रोहन खंवटे यांच्या पर्यटन विभागाच्या वतीने को-वर्किंग स्पेसेसची संकल्पना तयार केली असून, लोकांना नोमाड व्हिसावर राज्यात काम करण्यासह सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेता येईल.

यासंबधित मोरजी आणि आश्वे समुद्रकिनाऱ्यावर सुविधा निर्माण केल्या जात असून, लवकरच त्या वापरासाठी उपबल्ध होतील, असे आहुजा म्हणाले. काम आणि पर्यटनासाठी गोव्यात येणाऱ्यांना नोमाड व्हिसा द्यावा, अशी विनंती गृह खाते आणि परराष्ट्र व्यव्हार विभागाकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकार केंद्र सरकारसोबत चर्चा करत असून, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी याबाबत सकारात्मक निर्णय येणे अपेक्षित आहे, असे आहुजा म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com