Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

Brother Shoots Two Sisters In Roorkee: उत्तराखंडमधील रुडकी शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली.
Brother Shoots Two Sisters In Roorkee
Double Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Roorkee Double Murder Case: उत्तराखंडमधील रुडकी शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली. गंगनहर कोतवाली हद्दीत मंगळवारी उशिरा संध्याकाळी एका माथेफिरु तरुणाने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या अंधाधुंद गोळीबारात त्याचा मेहुणादेखील गंभीर जखमी झाला असून त्याची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु आहे.

अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने दोन्ही घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला.

Brother Shoots Two Sisters In Roorkee
Crime News: चाकू भोसकून महिला प्राचार्याची हत्या; 10वीच्या दोन विद्यार्थ्यांनी रचला कट, 'बाबू' शब्द आणि iPhoneमुळे समोर आलं धक्कादायक रहस्य

मिळालेल्या माहितीनुसार, विक्की असे आरोपी तरुणाचे नाव असून त्याने पूर्व नियोजित कटाप्रमाणे हा गोळीबार केला. आरोपीने (Accused) सर्वात आधी गणेशपुर भागात राहणारी आपली बहीण शकुंतला हिच्यावर गोळ्या झाडल्या, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर लगेचच आरोपीने आझाद नगर पनियाला रोड येथील संतोषी माता मंदिरासमोरील गल्ली नंबर 5 गाठली आणि तिथे राहणारी दुसरी बहीण पुष्पा व मेहुण्यावर अंधाधुंद गोळीबार केला. या घटनेत पुष्पाचाही जागीच मृत्यू झाला, तर तिचा नवरा गंभीर जखमी झाला.

Brother Shoots Two Sisters In Roorkee
Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातील भिंडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि पिकअपच्या धडकेत 8 मजुरांचा मृत्यू, 25 जण गंभीर जखमी

गोळीबाराचा थरार घडवल्यानंतर आरोपी विक्की घटनास्थळावरुन फरार होण्यात यशस्वी झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले आणि जखमी मेहुण्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींची हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच रुडकी शहरात हल्लकल्लोळ उडाला. सध्या पोलिसांनी दोन्ही घटनास्थळे सील करुन महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

Brother Shoots Two Sisters In Roorkee
Madhya Pradesh Abortion Case: गर्भ की गर्भपात? फैसला फक्त आईचा, बापाचा नाही! 2 वर्षांच्या संसारानंतर वेगळ्या झालेल्या महिलेसाठी 'कोर्ट' बनले पाठीराखा

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली असून आरोपीच्या शोधात संभाव्य ठिकाणांवर छापे मारले जात आहेत. तसेच परिसरातील मुख्य रस्ते आणि घटनास्थळांच्या आसपासचे सीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, जेणेकरुन आरोपीचा पळून जाण्याचा मार्ग स्पष्ट होऊ शकेल. प्राथमिक तपासात ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात असला, तरी पोलिसांनी अद्याप हत्येच्या मुख्य कारणाचा अधिकृत खुलासा केलेला नाही. आरोपीला लवकरात लवकर अटक करून या घटनेमागील सत्य समोर आणण्याचे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com