Rohit Sharma Record: 'हिटमॅन'च्या निशाण्यावर बूम बूम आफ्रिदीचा 'तो' मोठा रेकॉर्ड; तिसऱ्या सामन्यात रोहित रचणार इतिहास

IND VS NZ 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा अंतिम आणि निर्णायक सामना १८ जानेवारी रोजी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगणार आहे.
Rohit Sharma Record
Rohit Sharma RecordDainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा अंतिम आणि निर्णायक सामना १८ जानेवारी रोजी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा एका मोठ्या जागतिक विक्रमाला गवसणी घालण्याच्या उंबरठ्यावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा मान मिळवण्यासाठी रोहितला आता केवळ दोन षटकारांची गरज आहे. जर त्याने हे साध्य केले, तर तो पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदीचा अनेक वर्षांचा विक्रम मोडीत काढेल.

आफ्रिदीला मागे टाकण्याची संधी

रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध आतापर्यंत ३३ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने ४९ षटकार ठोकले आहेत. सध्या या यादीत पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी ५० षटकारांसह अव्वल स्थानी आहे. रोहितला आफ्रिदीची बरोबरी करण्यासाठी केवळ एक, तर त्याला ओलांडून विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी दोन षटकारांची आवश्यकता आहे.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (४५ षटकार) असून, रोहितने त्याला आधीच मागे टाकले आहे. 'सिक्सर किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितसाठी दोन षटकार मारणे फारसे कठीण काम नाहीय.

Rohit Sharma Record
Goa News: '..अन्यथा गोवा महाराष्ट्राचा जिल्हा झाला असता', CM सावंतांनी दिला इतिहासाला उजाळा; मिठागरांच्या संवर्धनाबाबत केले सूतोवाच

चालू मालिकेत रोहितला चांगली सुरुवात मिळाली आहे, परंतु त्याला त्याचे रूपांतर मोठ्या शतकी खेळीत करता आले नाही. पहिल्या सामन्यात त्याने २६ तर दुसऱ्या सामन्यात २४ धावा केल्या. दोन्ही वेळा तो स्थिरावलेला दिसत असतानाच बाद झाला.

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ३५७ षटकारांसह रोहित आधीच जगात नंबर-१ वर आहे. आता इंदूरच्या छोट्या मैदानाचा फायदा घेत तो आपल्या चाहत्यांना एक मोठी आणि फटकेबाज खेळी भेट देईल, अशी आशा आहे.

Rohit Sharma Record
Goa News: 'कॅश-फॉर-जॉब घोटाळ्यासंबंधित 19 प्रकरणांची चौकशी सुरु...'- CM सावंतांनी स्पष्टच सांगितलं; वाचा दिवसभरातील घडामोडी

इंदूरचे होळकर मैदान फलंदाजांसाठी नंदनवन मानले जाते आणि येथे रोहितची कामगिरीही दमदार राहिली आहे. या मैदानावर त्याने आतापर्यंत ५ एकदिवसीय सामने खेळले असून ४१ च्या सरासरीने २०५ धावा केल्या आहेत.

विशेष म्हणजे, याच मैदानावर २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना रोहितने १०१ धावांची शानदार शतकी खेळी केली होती. या वेन्यूवर त्याचा स्ट्राईक रेट ११० पेक्षा जास्त असल्याने, तो पुन्हा एकदा किवी गोलंदाजांवर तुटून पडण्याची शक्यता अधिक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com