CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

Goa News: '..अन्यथा गोवा महाराष्ट्राचा जिल्हा झाला असता', CM सावंतांनी दिला इतिहासाला उजाळा; मिठागरांच्या संवर्धनाबाबत केले सूतोवाच

Asmitai Dis: मिठागर (सॉल्ट पॅन) शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्वी मोठ्या संख्येने मिठागर शेतकरी होते, मात्र आता त्यांची संख्या फारच कमी झाली आहे.
Published on

पणजी: गोवा महाराष्ट्रात विलीन करावा की स्वतंत्र राज्य ठेवावा, या मुद्द्यावर त्या काळात मोठे आंदोलन झाले होते. त्या वेळी गोव्याच्या नेत्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गोव्याने आपली स्वतंत्र अस्मिता जपली आणि स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवला.

अन्यथा गोवा महाराष्ट्राचा एक जिल्हा झाला असता आणि सीमावर्ती जिल्ह्यांना ज्या अडचणींचा सामना करावा लागतो, त्याच समस्या गोव्यालाही भोगाव्या लागल्या असत्या, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. राज्यात ‘अस्मिताय दीस'च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोलत होते.

CM Pramod Sawant
Asmitai Dis: पणजीसह राज्यात आज 'अस्मिताय दीस', 'जीआय टॅग'प्राप्त अर्जदारांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सत्कार

पुढे ते म्हणाले की गोवा पर्यटन राज्य म्हणून विकसित झाला असून जागतिक पर्यटन नकाशावर गोव्याचे स्थान कायम राखण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य, नद्या आणि पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ सरकारचीच नव्हे तर जनतेचीही जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

CM Pramod Sawant
Goa Opinion Poll Day: 'अस्मिताय दिन' शासकीय स्तरावर साजरा होणार मुख्यमंत्री सावंतांचे आश्‍वासन; युरींचा ठराव मागे

याशिवाय, मिठागर (सॉल्ट पॅन) शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्वी मोठ्या संख्येने मिठागर शेतकरी होते, मात्र आता त्यांची संख्या फारच कमी झाली आहे. त्यांना पाठबळ दिले नाही तर मिठागर शेतकऱ्यांची कहाणी फक्त पुस्तकांपुरतीच उरेल. त्यामुळेच सरकारने मिठागर शेतकऱ्यांना ओळखपत्रे दिली असून प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन मिठागरांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com