

Rohit Sharma Forgets His Empty Apple AirPods Video
माजी भारतीय क्रिकेट कर्णधार रोहित शर्मा याचा विसरभोळेपणा चाहत्यांमध्ये कायम चर्चेचा विषय असतो. स्वतः रोहितनेही अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितले आहे की त्याला लहानसहान गोष्टी विसरण्याची सवय आहे. यापूर्वी त्याने हॉटेलमध्ये पासपोर्ट विसरल्याची घटना गाजली होती. आता रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर पुन्हा एकदा अशीच घटना घडली.
सामना संपल्यानंतर रोहित शर्मा टीम बसमधून विमानतळावर जाण्यास निघाला. त्यावेळी तो एअरपॉड्सवर संगीत ऐकत होता. मात्र, उतरतानाच त्याच्या लक्षात आले नाही की एअरपॉड्सचा बॉक्स तो बसमध्येच विसरला आहे. थोड्याच वेळात टीमच्या एका सपोर्ट स्टाफ सदस्याने एअरपॉड्स शोधून रोहितकडे परत दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
रांची सामन्यात मात्र रोहितची कामगिरी तितकीच प्रभावी राहिली. त्याने ५१ चेंडूत ५७ धावा करत अर्धशतकी खेळी साकारली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ३ षटकार लगावले. त्याचबरोबर त्याने विराट कोहलीसोबत १३६ धावांची महत्त्वाची भागीदारी केली, जी भारतीय डावाला भक्कम आकार देणारी ठरली.
या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली होती. तरीही विराट कोहलीच्या १३५ धावांच्या भक्कम खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकांत ३४९ धावांचे लक्ष्य उभे केले. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेनेही जोरदार प्रतिकार केला.
सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. परंतु अखेर दुसऱ्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेची इनिंग ३२२ धावांवर थांबली आणि भारताने १७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.