Goa Revenue: गोवा सरकारच्या तिजोरीत 5410 कोटी! केंद्राकडून आकडेवारी जारी; पेट्रोलियम पदार्थ, गॅस करातून प्राप्ती

Goa Government Revenue: केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस राज्‍यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्‍यसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.
Goa government revenue
Goa government revenueDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक गॅस कराच्‍या माध्‍यमातून राज्‍य सरकारला गेल्‍या पाच वर्षांत सुमारे ५,४१० कोटींचा महसूल प्राप्‍त झालेला आहे. त्‍यात जीएसटीच्‍या माध्‍यमातून आलेल्‍या ६०.८६ कोटींचाही समावेश आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस राज्‍यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्‍यसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. पेट्रोलियम पदार्थ तसेच नैसर्गिक गॅसची वाहतूक, वितरणाद्वारे राज्‍य सरकारला रॉयल्‍टी, अबकारी कर, जीएसटीच्या माध्‍यमातून दरवर्षी कोट्यवधींचा महसूल मिळत असतो.

राज्‍य सरकारला गेल्‍या पाच वर्षांच्‍या काळात या माध्‍यमातून ५,४१० कोटींचा महसूल मिळाला असून प्रत्‍येकवर्षी या करात वाढ झाल्‍याचेही मंत्री गोपी यांनी उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.

Goa government revenue
Tax Saving Tips: 15 लाख पगार घेत असाल? तरीही एक रुपयाही कर लागणार नाही, कसं ते जाणून घ्या

पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस कर

वर्ष महसूल (कोटींत)

२०२०–२१ ६८१.५०

२०२१–२२ ९९३.६०

२०२२–२३ १,२७८.१०

२०२३–२४ १,१८२.७०

२०२४–२५ १,२७४.१०

Goa government revenue
SOPO Tax: दक्षिण गोव्यातील 'सोपो' प्रकरणात घोटाळ्याची शक्यता! निविदा जारी करण्यास विलंब; SGPDAचे आर्थिक नुकसान

जीएसटीच्‍या रुपात मिळालेला कर

वर्ष महसूल (कोटींत)

२०२०–२१ १०.०६

२०२१–२२ १४.६०

२०२२–२३ ९.६०

२०२३–२४ १८.१०

२०२४–२५ ८.५०

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com