

फुटबॉल जगतातील महानायक लिओनेल मेस्सी नुकताच भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यादरम्यान त्याने रिलायन्स समूहाच्या 'वनतारा' प्रकल्पाला भेट दिली. या भेटीची जेवढी चर्चा झाली, त्यापेक्षा जास्त चर्चा आता मेस्सीला मिळालेल्या एका खास भेटीची होत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी मेस्सीला तब्बल १० कोटी रुपये किमतीचे एक अत्यंत दुर्मिळ घड्याळ भेट म्हणून दिले आहे. हे घड्याळ केवळ महागडेच नाही, तर तंत्रज्ञानाचा एक अद्भूत नमुना मानले जाते.
अनंत अंबानींनी मेस्सीला 'रिचर्ड मिल RM 003-V2 टूरबिलन' (Richard Mille RM 003-V2 Tourbillon) हे घड्याळ भेट दिले आहे. या घड्याळाची किंमत अंदाजे १.१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे १० कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, या मॉडेलचे जगभरात केवळ १२ नग उपलब्ध आहेत, ज्यामुळे ते अत्यंत दुर्मिळ ठरते. हे घड्याळ मेस्सीच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असून त्यातील 'लिमिटेड एडिशन' टॅग त्याची किंमत अधिक वाढवतो.
या घड्याळाचे फिचर्स थक्क करणारे आहेत. याचे ३८ मिमीचे केस 'कार्बन थिन प्लाय' तंत्रज्ञानाने बनवलेले आहे. हे तेच मटेरियल आहे जे प्रामुख्याने एरोस्पेस आणि फॉर्म्युला वन रेसिंग कारसाठी वापरले जाते. यात 'मॅन्युअल-वाइंडिंग टूरबिलन मूव्हमेंट' असून, गुरुत्वाकर्षणामुळे घड्याळाच्या अचूकतेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी हे डिझाइन करण्यात आले आहे. यात ड्युअल टाइम झोन इंडिकेटर, पॉवर रिझर्व्ह आणि टॉर्क इंडिकेटर यांसारख्या हाय-टेक सुविधा आहेत.
या घड्याळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातील 'फंक्शन सिलेक्टर'. कारच्या गिअरबॉक्सप्रमाणेच या घड्याळाच्या क्राउनमध्ये एक पुशर दिला आहे. याद्वारे वापरकर्ता वाइंडिंग (W), न्यूट्रल (N) आणि हँड-सेटिंग (H) अशा तीन मोडमध्ये घड्याळ सेट करू शकतो. ७० तासांचा पॉवर रिझर्व्ह असलेल्या या घड्याळात ९ वाजता एक बटण दिले आहे, ज्याद्वारे दुसऱ्या देशातील वेळ सहजपणे ॲडजस्ट करता येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.