देशभरातील विधानसभा पोटनिवडणुकांचे आज निकाल

डिसेंबर 2021 मध्ये, कोविड-19 मुळे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूरची जागा रिक्त झाली.
Election
ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: छत्तीसगडमधील खैरागड, बिहारमधील बोचाहान आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर विधानसभा या जागांसह पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघ येथे झालेल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार आहे. पश्चिम बंगालमधील आसनसोल आणि बालीगंगे या जागा तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजपसाठी महत्वाच्या मानल्या जात आहेत. (Results of Vidhan Sabha by-elections across the country today)

Election
''मी पुन्हा येईन''! मंत्री केएस ईश्वरप्पांनी दिला राजीनामा

हिंदी भाषिक लोकसंख्या असलेल्या आसनसोलमध्ये सत्ताधारी टीएमसीने अभिनेते-राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपने आसनसोल दक्षिणमधून आमदार अग्निमित्रा पॉल यांना उमेदवारी दिली आहे.

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या पक्षाने बाबुल सुप्रियो यांना बल्लीगंगेमधून उमेदवारी दिली आहे, जिथे ते भाजपच्या किया घोष आणि सीपीआय(एम) च्या सायरा शाह हलीम यांच्या विरोधात उभे आहेत. दोन्ही जागांवर काँग्रेसही रिंगणात आहे. पोटनिवडणुकीत आसनसोलमध्ये 64.03 टक्के मतदान झाले, तर बल्लीगंगेमध्ये 41.10 टक्के मतदान झाले. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की आसनसोलपूर्वी बाबुल सुप्रियो हे भाजपचे खासदार होते. त्यांनी भाजपचा राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि खासदारकी सोडून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.

Election
मैदानी भागात पावसाचा प्रभाव, तर उत्तर भारतातील राज्यांमध्ये उष्णतेची लाट

महाराष्ट्रात कोल्हापूर मतदारसंघासाठी पोटनिवडणूक

डिसेंबर 2021 मध्ये, कोविड-19 मुळे काँग्रेसचे (Congress) आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूरची (Kolhapur) जागा रिक्त झाली. या जागेसाठी पोटनिवडणूक घ्यावी लागली. कोल्हापुरात झालेल्या पोटनिवडणुकीत 60.09 टक्के मतदान झाले आहे. 15 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस हा राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांपैकी एक आहे. कोल्हापूर मतदारसंघातून काँग्रेसने दिवंगत आमदारांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपने सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली आहे.

छत्तीसगडमधील खैरागड जागेवर पोटनिवडणूक

छत्तीसगडमध्ये सत्ताधारी काँग्रेसच्या यशोदा वर्मा आणि भाजपच्या कोमल जांघेल यांच्यात मुख्य लढत आहे. कारण जनता काँग्रेस छत्तीसगड (जे) 2020 मध्ये संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या निधनानंतर आपला प्रभाव गमावला आहे. काँग्रेसने पोटनिवडणूक जिंकल्यास खैरागड जिल्हा करण्याचे आश्वासन दिले आहे. JCC(J) आमदार देवव्रत सिंह यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आणि येथे पोटनिवडणूक घ्यावी लागली. येथे 77.88 टक्के मतदान झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी आधी केली जाईल आणि नंतर ईव्हीएम मतांची मोजणी केली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com