''मी पुन्हा येईन''! मंत्री केएस ईश्वरप्पांनी दिला राजीनामा

कर्नाटकचे मंत्री केएस ईश्वरप्पा (Karnataka minister K S Eshwarappa) यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
Karnataka minister K S Eshwarappa
Karnataka minister K S EshwarappaDainik Gomantak
Published on
Updated on

भ्रष्टाचाराचे आरोप आणि कंत्राटदाराच्या आत्महत्येतील कथित भूमिकेमुळे वादात सापडलेले भाजपचे दिग्गज आणि कर्नाटकचे मंत्री केएस ईश्वरप्पा यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Chief Minister Basavaraj Bommai) यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. राजीनामा देण्यापूर्वी केएस ईश्वरप्पा यांनी समर्थकांना 'आपण परत येणार' काळजी करु नका, असे सांगितले. शक्तिप्रदर्शन करत ईश्वरप्पा राजधानी बंगळुरुला पोहोचले होते. (Karnataka minister K S Eshwarappa accused in contractor's suicide case has resigned)

Karnataka minister K S Eshwarappa
बोम्मई सरकारला मोठा झटका, मंत्री केएस ईश्वरप्पा देणार राजीनामा

दुसरीकडे, शिवमोग्गामध्ये ईश्वरप्पा यांच्या समर्थकांनी त्यांच्या 'सक्तीच्या राजीनाम्या' विरोधात निदर्शने केली. "मला पक्षातील माझ्या वरिष्ठ आणि हितचिंतकांसाठी कोणताही त्रास निर्माण करायचा नाही. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना भेटून राजीनामा सादर करणार आहे," असे ईश्वरप्पा यांनी पत्रकारांना सांगितले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला.

तसेच, ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री ईश्वरप्पा (K. S. Eshwarappa) यांच्यावर संतोष पाटील या ठेकेदाराने ‘कमिशन’ मागितल्याचा आरोप केला होता. पाटील यांनी मंगळवारी आत्महत्या केली. संतोष पाटील यांचा मृतदेह एका खासगी लॉजच्या रुममध्ये आढळून आला होता. या कंत्राटदाराने व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) मेसेजमध्ये ईश्वरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करुन उडुपीमध्ये आत्महत्या केली.

याशिवाय, कंत्राटदाराने आपल्या सुसाईड नोटमध्ये ईश्वरप्पा हे आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचे म्हटले होते. या प्रकरणी ईश्वरप्पा यांच्याविरुद्ध उडुपी पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम 306 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेच्या भावाने मंत्र्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ईश्‍वरप्पा यांचे दोन सहकारी बसवराज आणि रमेश यांचीही एफआयआरमध्ये नावे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com