Republic Day Parade Ticket: घरबसल्या करता येणार प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे तिकीट बुक, जाणून घ्या

26 January Parade: 26 जानेवारीच्या परेडसाठी हे तिकीट तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर सहज उपलब्ध होऊ शकते.
Parade
ParadeDainik Gomantak
Published on
Updated on

Republic Day Parade Ticket: जर तुम्हाला प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्यासाठी तिकीट घ्यायचे असेल तर त्यासाठी घर किंवा ऑफिसपासून दूर असलेल्या कोणत्याही तिकीट काउंटरवर जाण्याची गरज नाही. 26 जानेवारीच्या परेडसाठी हे तिकीट तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर सहज उपलब्ध होऊ शकते.

वास्तविक, आता तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे तिकीट ऑनलाईन बुक करु शकणार आहात, यासाठी तुम्हाला लाल किल्ला किंवा इतर कोणत्याही ठिकाणी बनवलेल्या तिकीट काउंटरवर जाण्याची गरज नाही.

दरम्यान, देशवासियांसाठी ही नवी सुविधा संरक्षण मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरु करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्यासाठी तिकिटे संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटला भेट देऊन बुक करता येतील. हे पोर्टल 6 जानेवारी 2023 पासून लाइव्ह झाले आहे. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी शुक्रवारी राजधानी दिल्लीत (Delhi) सरकारच्या या ई-गव्हर्नन्स उपक्रमाचा शुभारंभ केला.

Parade
Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर पहिल्यांदाच दिसणार 'या' गोष्टी...

तसेच, हे पोर्टल सर्वसामान्यांना स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन तिकीट खरेदी करण्याची सुविधा प्रदान करते. सर्वसामान्यांना ऑनलाइन तिकीट देण्याबरोबरच, हे व्यासपीठ मान्यवर आणि त्यांच्या पाहुण्यांना ऑनलाइन पास जारी करण्याची सुविधाही देत ​​आहे. नवी दिल्लीत दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन परेडचे आयोजन केले जाते.

यादरम्यान, कर्तव्य पथावर जल, थल आणि हवाई दलासह सुरक्षा दलांद्वारे भव्य परेड आयोजित केली जाते. या परेडचे थेट प्रक्षेपणही टीव्ही चॅनेलवर दाखवले जाते. मात्र, थेट प्रक्षेपण असूनही ही परेड पाहण्यासाठी नागरिक (Citizens) मोठ्या संख्येने कर्तव्य पथावर पोहोचतात. परेडच्या ठिकाणी जाण्यासाठी आणि परेड पाहण्यासाठी तिथे तिकीट आवश्यक आहे.

जिथे, आधी ही तिकिटे विशेष काउंटरवर विकली जायची, आता ही तिकिटे ऑनलाइन उपलब्ध होतील. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी तिकीट बुक करणे आता सोपे करण्यात आले आहे. यासाठी तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाऊन तिकीट काढावे लागेल.

Parade
Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार 'या' मुस्लिम देशाचे राष्ट्राध्यक्ष

यावेळी, प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण आणि तिकीट ऑनलाइन उपलब्ध असेल. त्यासाठी फक्त संरक्षण मंत्रालयाच्या पोर्टलवर क्लिक करावे लागेल. येथे येणाऱ्या लिंकवर तुमच्या डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला ऑनलाइन तिकीट घरी बसून मिळेल.

Parade
Republic Day 2022: PM मोदींनी ख्रिस गेलला लिहलं पत्र, 'युनिव्हर्स बॉस' नं दिलं हे उत्तर

विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांत कोरोना संसर्गामुळे अनेक कोविड-19 निर्बंध लागू होते. प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवातही कोरोना निर्बंधांचे पालन करण्यात आले होते. समारंभाला उपस्थित राहणाऱ्यांची संख्याही मर्यादित होती. या वर्षी परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहण्याची अपेक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com