Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर पहिल्यांदाच दिसणार 'या' गोष्टी...

नौदलाचे विंटेज विमान पहिल्यांदाच कसरती दाखवणार
Republic Day 2023
Republic Day 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Republic Day 2023: देशाची राजधानी दिल्लीतील राजपथ हा 'कर्तव्य पथ' झाल्यानंतर होणारा हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संस्मरणीय बनवण्यासाठी यंदा अनेक नव्या गोष्टी होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भव्य आणि संस्मरणीय परेडसह अनेक नवीन गोष्टी दिसणार आहेत.

संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. दरम्यान, यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रेक्षकांची संख्या कमी करण्यात आली आहे.

राफेल आणि सुखोईसह यंदा पहिल्यांदाच आणि अखेरच्या वेळी नौदलाचे सर्वात जुने टोही विमान IL-38 आकाशात कसरती करताना दिसेल. यंदाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची झलक नवीन बदलत्या भारताची अनुभूती देईल.

Republic Day 2023
Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार 'या' मुस्लिम देशाचे राष्ट्राध्यक्ष

इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे

इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह एल सिसी हे यंदाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. 120 इजिप्शियन सैनिकांची तुकडीदेखील कर्तव्य पथावर प्रथमच औपचारिक संचलनात सहभागी होईल.

व्हीआयपी पासमध्ये केली घट

व्हीआयपी निमंत्रण पासच्या संख्येत मोठी कपात करण्यात आली आहे. यंदा राष्ट्रीय राजधानीतील कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिन 2023 परेड पाहण्यासाठी एकूण 45,000 प्रेक्षक येतील.

यापूर्वी दरवर्षी 1.25 लाखांहून अधिक लोकांना आमंत्रित केले जात होते आणि कोविड कालावधीत केवळ 25,000 लोकांनाच आमंत्रित केले गेले होते.

32000 तिकिटांची ऑनलाइन विक्री होत असून काही तिकिटे काउंटरवरूनही लोकांना उपलब्ध होणार आहेत. बीटिंग द रिट्रीट सोहळ्यासाठी 10 टक्के जागा सर्वसामान्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्य चळवळीत अतुलनीय योगदान देणाऱ्या आदिवासी समाजातील दिग्गज वीरांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात होईल.

लष्करी टॅटू आणि आदिवासी नृत्य महोत्सव, वीर गाथा 2.0, वंदे भारतम नृत्य स्पर्धा, राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे लष्करी आणि तटरक्षक बँड; राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे अखिल भारतीय शालेय बँड स्पर्धा, बीटिंग द रिट्रीट सेरेमनी दरम्यान ड्रोन शो आणि प्रोजेक्शन मॅपिंग इ.कार्यक्रम होतील.

Republic Day 2023
Cashew Production In Goa: थंडीमुळे काजूला मोहोर, मात्र 'यामुळे' उत्पादनावर होऊ शकतो परिणाम

सशस्त्र दल, घोड्यांचा शो, खुकुरी नृत्य, गटका, मल्लखांब, कलारीपयट्टू, थांग-ता, मोटरसायकल डिस्प्ले, एअर वॉरियर ड्रिल, नेव्ही बँड आणि मार्शल आर्ट्स सादर होतील. परेडनंतर 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह सहा विविध मंत्रालये आणि विभागांचे चित्ररथ असतील.

50 विमानांचा सहभाग असलेले लढाऊ विमानांचा फ्लाय पास्ट हे सर्वात मोठे आकर्षण असेल. यात 23 लढाऊ विमाने, 18 हेलिकॉप्टर, आठ लष्करी वाहतूक विमाने आणि एक विंटेज विमान असेल. नौदलाचे हे विंटेज विमान IL 38 या वर्षाच्या अखेरीस निवृत्त केले जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com