Republic Day 2022: PM मोदींनी ख्रिस गेलला लिहलं पत्र, 'युनिव्हर्स बॉस' नं दिलं हे उत्तर

पीएम मोदींनी (Prime Minister Narendra Modi) युनिव्हर्स बॉस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलला (Chris Gayle) पत्र लिहिले आहे.
Prime Minister Narendra Modi & Chris Gayle
Prime Minister Narendra Modi & Chris Gayle Dainik Gomantak

भारत आपला 73 वा प्रजासत्ताक दिन 2022 साजरा करत आहे. या पवित्र प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांसह परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांचेही आभार मानले. तसेच पंतप्रधानांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन बड्या क्रिकेटपटूंना पत्र लिहून भारतासोबतच्या मजबूत संबंधांची प्रशंसा केली आहे. पीएम मोदींनी (Prime Minister Narendra Modi) युनिव्हर्स बॉस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलला (Chris Gayle) पत्र लिहिले, तर असेच पत्र दक्षिण आफ्रिकेचे (South Africa) माजी क्रिकेटर आणि महान क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्स (Jonty Rhodes) यांनाही लिहिले. पीएम मोदींच्या या पत्राने दोन्ही क्रिकेटपटू खूप खूश झाले आणि त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांना याची माहिती दिली. (Prime Minister Narendra Modi Wrote A Letter To Chris Gayle On The Occasion Of Republic Day)

दरम्यान, पीएम मोदींकडून मिळालेल्या पत्राची माहिती देताना ख्रिस गेलने लिहिले की, ''73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी भारताला शुभेच्छा देतो. आज सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मला पंतप्रधान मोदींचा एक संदेश मिळाला ज्यामध्ये त्यांनी माझ्या आणि भारतीय लोकांमधील संबंधांचा उल्लेख केला होता. युनिव्हर्स बॉसकडून अभिनंदन आणि प्रेम.''

Prime Minister Narendra Modi & Chris Gayle
ICC ODI Rankings: विराट अन् रोहित टॉप-10 मध्ये कायम, बुमराह सातव्या स्थानावर !

जॉन्टी रोड्सनेही पंतप्रधान मोदींचे आभार मानले

जॉन्टी रोड्सने पीएम मोदींकडून आलेले पत्र सोशल मीडियावर (Social Media) चाहत्यांसोबत शेअर केले आहे. पंतप्रधान मोदींचे आभार मानत जॉन्टीने लिहिले, 'नरेंद्र मोदी जी तुमच्या शब्दांसाठी धन्यवाद. मी जेव्हा जेव्हा भारतात आलो तेव्हा खूप काही शिकलो. माझे संपूर्ण कुटुंब भारतासोबत प्रजासत्ताक साजरा करत आहे. भारतीयांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या संविधानाचा मी आदर करतो. 'जय हिंद' या शब्दाने जॉन्टी रोड्स भारताबद्दल इतका प्रभावित झाला आहे की, त्याने आपल्या मुलीचे नाव इंडिया ठेवले आहे. जॉन्टी क्रिकेटच्या निमित्ताने अनेकवेळा भारतात येतो. आयपीएलमध्ये तो बराच काळ मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. त्यानंतर तो पंजाब किंग्जमध्येही सामील झाला.

त्याचबरोबर ख्रिस गेलनेही आयपीएलच्या प्रत्येक मोसमात भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत. गेलने भारतीय गायकांसोबत व्हिडिओही रेकॉर्ड केले आहेत. मात्र, यावेळी ख्रिस गेलने आयपीएल लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com