Rahul Gandhi Fulfilled Promise: मध्यप्रदेशातील 'या' तीन मुलींसह राहुल गांधींची हेलिकॉप्टर सवारी

20 मिनिटांच्या प्रवासानंतर तिघींना दिली चॉकलेट्स आणि फोटोही काढले...
Rahul Gandhi Fulfilled Promise
Rahul Gandhi Fulfilled PromiseDainik Gomantak
Published on
Updated on

Rahul Gandhi Fulfilled Promise: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत मध्यप्रदेशातील तीन मुलींना हेलिकॉप्टरची सवारी घडवली आहे. या तीन मुलींसोबत राहुल गांधींनी जवळपास 20 मिनिटे हा प्रवास केला. त्यानंतरही त्यांनी या मुलींना चॉकलेट देत त्यांची रवानगी केली.

Rahul Gandhi Fulfilled Promise
Himanta Biswa Sarma: मुस्लिम महिलांनी दोन पेक्षा जास्त मुले जन्माला घालू नयेत; आम्ही 25 मुले जन्माला घालू...

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानात आहे. गुरूवारी बुंदी जिल्ह्यात या यात्रेने प्रवेश केला. कोटा येथील यात्रा पुर्ण झाल्यानंतर राहुल थेट बुंदी येथील गुडली येथे तयार केलेल्या हेलिपॅडवर पोहचले. तिथे मध्यप्रदेशातील उज्जैन येथील तीन विद्यार्थिनी राहुल गांधींची वाट पाहात थांबल्या होत्या. त्या राहुल गांधींसोबत हेलिकॉप्टर राईडसाठी आल्या होत्या.

29 नोव्हेंबर रोजी उज्जैन येथे भारत जोडो यात्रेत 11 वी मध्ये शिकणाऱ्या दोन आणि दहावीतील एका मुलीने राहुल गांधींची भेट घेतली होती. शीतल, अंतिमा आणि दहावीत शिकणारी गिरीजा अशी या तीन मुलींची नावे आहेत. यावेळी राहुल यांनी या मुलींच्या करीयरबाबत, स्वप्नांबाबत चर्चा केली होती. राहुल यांनी विचारले होते की, शालेय शिक्षणानंतर तुमची आणखी काय स्वप्ने आहेत.

तेव्हा बोलताबोलता या मुलींनी सहजच राहुलसोबत हवाई प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी राहुल यांनी या तीन मुलींना लवकरच हवाई प्रवास करूया, असे आश्वासन दिले होते. दरम्यान, मध्यप्रदेशात दिलेले हे आश्वासन राहुल गांधींनी दहा दिवसातच राजस्थानात पुर्ण केले.

Rahul Gandhi Fulfilled Promise
Himachal CM Face: हिमाचलमध्ये नवा मुख्यमंत्री निवडणे काँग्रेससाठी बनले डोकेदुखी!

या हेलिकॉप्टर राईडबाबत या विद्यार्थीनी कमालीच्या उत्सुक होत्या. जवळपास 20 मिनिटे ही हेलिकॉप्टर राईड सुरू होती. या प्रवासात त्यांनी हेलिकॉप्टरच्या पायलटला अनेक प्रश्न विचारले. अनेक तांत्रिक गोष्टी समजाऊन घेतल्या. राहुल यांनी त्यांना करीयरबाबत काही सूचनाही केल्या. हेलिकॉप्टरमधुन उतरताना राहुल यांनी या तिन्ही मुलींना चॉकलेटही दिली. तिघींसमवेत राहुल यांनी फोटोही काढले. त्यानंतर राहुल गांधी सोनिया गांधींच्या भेटीसाठी थेट सवाईमाधोपूरला रवाना झाले.

उज्जैनमधील 11वीची विद्यार्थिनी शीतल पाटीदार, अंतिमा पंवार आणि दहावीतील गिरजा पंवार या तिघींनी या राईडनंतर पहिल्यांदाच थेट राहुल गांधींसमवेत हेलिकॉप्टरमध्ये बसल्याने स्वप्नपुर्ती झाल्याचे सांगितले. हा क्षण कल्पनेच्या पलीकडील असून अविस्मरणीय असल्याचेही त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com