Himachal CM Face: हिमाचलमध्ये नवा मुख्यमंत्री निवडणे काँग्रेससाठी बनले डोकेदुखी!

Congress: हिमाचलमध्ये काँग्रेसच्या दमदार विजयानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
Congress
CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Who Will Be Next Chief Minister Of Himachal Pradesh: हिमाचलमध्ये काँग्रेसच्या दमदार विजयानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. या प्रश्नावरुन पक्षांतर्गत तणावाचे वृत्त आहे. मात्र, पक्षाच्या हायकमांडने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि हरियाणाचे ज्येष्ठ नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांना निरीक्षक म्हणून हिमाचलला पाठवले आहे. मुख्यमंत्रिपदासाठीच्या तोंडी निवडणुकीत सहकार्य करण्याची आणि पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांना सोबत घेऊन हा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे.

दरम्यान, काँग्रेसने (Congress) आज हिमाचलमध्ये सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. मात्र, मुख्यमंत्रीपदासाठी अनेक दावेदार उपस्थित असल्याने हिमाचलमध्ये प्रत्येक नेत्याचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. काँग्रेसचे निरीक्षक तिथे पोहोचताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाला घेराव घालून घोषणाबाजी सुरु केली. बऱ्याच प्रयत्नानंतर कार्यकर्त्यांना वाहनासमोरुन हटवण्यात आले.

Congress
Himachal Pradesh Election Result: काँग्रेस उद्या ठरवणार हिमाचल प्रदेशचा मुख्यमंत्री; 'या' नेत्यांच्या नावांची चर्चा

तसेच, हुड्डा आणि बघेल यांच्यासोबत हिमाचल प्रदेशचे प्रभारी राजीव शुक्ला हेही शिमला येथे पोहोचले आहेत. हिमाचलच्या राज्यपालांची आपण भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वास्तविक, काँग्रेसला असा मुख्यमंत्री हवा आहे, जो पक्षाला एकसंध ठेवू शकेल. हिमाचल विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 68 पैकी 40 जागा जिंकून भारतीय जनता पक्षाला (BJP) धूळ चारली.

Congress
Himachal Pradesh Result: सलमान खानच्या नातेवाईकाने मारली बाजी, 'मात्र...'

मुख्यमंत्री पदासाठी किती दावेदार?

हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी आणि प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह या काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर दिसत आहेत. त्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. त्यांच्याशिवाय हिमाचल प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुखविंदर सिंग सुखू आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते मुकेश अग्निहोत्री हेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.

तसेच, मुख्यमंत्रीपदाच्या निवडीबाबत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांनी सांगितले की, 'आमदारांच्या बैठकीत सर्वांचे मत घेतले जाईल. यानंतर निरीक्षक पक्षाच्या हायकमांडपर्यंत सामूहिक इच्छाशक्ती पोहोचवतील.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com