Rahul Gandhi: राहुल गांधींवर 'KGF-2' मधील म्युझिक चोरल्याचा आरोप; कंपनीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

कॉपीराईटचा भंग केल्याचा गुन्हा; भारत जोडो यात्रेत या म्युझिकचा वापर
Rahul Gandhi
Rahul GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात कॉपीराईट कायद्याचा भंग केल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रा करत आहेत. या यात्रेत कन्नड अभिनेता सुपरस्टार यश याच्या 'KGF-2' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील संगीत वापरल्याचा आरोप राहुल गांधींवर ठेवला आहे.

Rahul Gandhi
Arvind Kejriwal: गुजरात निवडणूक लढवू नका, 'या' मंत्र्याला सोडतो; भाजपने ऑफर दिल्याचा केजरीवालांचा गौप्यस्फोट

त्यावरून राहुल गांधींविरोधात कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत 'KGF-2' ची म्युझिक लेबल कंपनी MTR ने तक्रार दाखल केली आहे. राहुल यांनी भारत जोडो यात्रेच्या प्रसिद्धीसाठी 'KGF-2' मधील 'समुंदर में लहर उठी है ज़िद्दी ज़िद्दी है तूफ़ान चट्टानें भी काँप रही है ज़िद्दी ज़िद्दी है तूफ़ान...' या गाण्याचा वापर केल्याचा आरोप कंपनीने केला आहे. या गाण्याचा वापर करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नाही, असेही कंपनीने म्हटले आहे.

म्युझिक कंपनी MTR ने 'KGF 2' च्या हिंदी व्हर्जनच्या हक्कांसाठी निर्मात्यांना मोठी रक्कम मोजली होती. पण काँग्रेस याचा राजकीय फायद्यासाठी वापर करत आहे. MTR म्युझिक कंपनीचे बिझनेस पार्टनर एम. नवीन कुमार यांनी याप्रकरणी बंगळुरच्या यशवंतपूर पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश, सुप्रिया श्रीनेत यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rahul Gandhi
Elon Musk Twitter Account: आता काय म्हणाल? खुद्द एलन मस्कचेच ट्विटर अकाऊंट झाले हॅक; चक्क भोजपुरी भाषेत ट्विटस!

या यात्रेच्या निमित्ताने सध्या राहुल गांधी तेलंगणमधये आहेत. या यात्रेत ते देशाची वैविध्यपुर्ण संस्कृतीची झलकही दाखवत आहेत. त्यांनी ढिमसा या नृत्यातही भाग घेतला होता. कन्याकुमारीपासून ही यात्रा सुरू झाली आहे .तिथून केरळ, कर्नाटक असे करत ही यात्रा आता तेलंगणात पोहचली आहे. त्यानंतर ही यात्रा महाराष्ट्रात जाणार आहे. तिथून इतर राज्यांतून अखेर काश्मिरमध्ये या यात्रेची अखेर होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com