Arvind Kejriwal: गुजरात निवडणूक लढवू नका, 'या' मंत्र्याला सोडतो; भाजपने ऑफर दिल्याचा केजरीवालांचा गौप्यस्फोट

महाठग सुयश चंद्रशेखर याने केलेले आरोप म्हणजे भाजपच्या सुरस कथा असल्याची टीका
CM Arvind Kejriwal
CM Arvind KejriwalDainik Gomant

Arvind Kejriwal: आम आदमी पक्षाने गुजरात विधानसभा निवडणूक लढवू नये, म्हणून भाजपने एक ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट 'आप'चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

CM Arvind Kejriwal
HP Election: हिमाचल प्रदेशची निवडणूक खास, येत्या 25 वर्षांचा रोडमॅप ठरणार -PM मोदी

अरविंद केजरीवाल म्हणाले की, आप'ने जर गुजरात विधानसभा निवडणूक लढवू नये, आम्ही दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना सोडतो, अशी ऑफर भाजपने आम्हाला दिली होती. पण मी म्हटले, सत्येंद्र जैन यांना आणखी तीन महिने तुरूंगात ठेवा. पण तुम्ही आम्हाला तोडू शकणार नाही.

महाठग सुकेश चंद्रशेखर याने 'आप'चे मंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरोधात लिहिलेले पत्र हे भाजपच्या सुरस कथांचा भाग आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

सुकेश चंद्रशेखरच्या माध्यमातून आपला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या दुर्घटनेवरून इतरत्र लक्ष वळविण्याचा हा प्रकार आहे. पण सुकेश चंद्रशेखरच्या सुरस कथांमध्ये कुणालाही रस नाही, त्यामुळे भाजपला त्याचा फायदा होणार नाही, असे केजरीवाल म्हणाले.

CM Arvind Kejriwal
National Anthem: 'वंदे मातरम'लाही 'जन गण मन' प्रमाणेच समान दर्जा, HC मध्ये सरकारचे उत्तर

आम्ही लोकांच्या हिताचे बोलतो. जैन यांच्या याचिकेची संपुर्ण प्रक्रिया पाहा. त्यांना 15 सप्टेंबरच्या आसपास जामिन मिळाला. जैन यांच्याविरोधात पुरावे देता आले नाहीत त्यामुळे न्यायाधीश बदलले. त्यानंतर दीड महिने न्यायाधीश बलण्याची कारवाई सुरू आहे. आता दहा दिवसांपुर्वी जामिनाची कार्यवाही सुरू झाली आहे. गुजरातमध्ये भाजपने काम केले असते तर 27 वर्षांनी आम्हाला तिथे स्थान मिळाले नसते. गुजरातमधील लोक आता मला भाऊ मानत आहेत, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com