Karnataka Assembly: कर्नाटक विधानसौधमध्ये काँग्रेसने शिंपडले गोमूत्र, गंगाजल; 'शुद्धीकरण' केल्याचा दावा

हनुमान चालिसाचे पठण, हवन आणि पुजा; भाजपने भ्रष्टाचाराने विधानसौध अपवित्र केल्याचा काँग्रेसचा आरोप
Congress Purifies Karnataka Vidhana Saudha by sprinkle Gomutra And Gangajal
Congress Purifies Karnataka Vidhana Saudha by sprinkle Gomutra And Gangajal Google Image

Congress sprinkles Gangajal in Karnataka Assembly: भाजपला निवडणुकीत पराभूत करून कर्नाटकात सत्तेत आलेल्या काँग्रेस पक्षाने सोमवारी कर्नाटक विधानसभेत पहिल्यात दिवशी विधानसौध तसेच विधानसौध परिसराचे परिसराचे शुद्धीकरण केले.

पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा भवनात गंगाजल आणि गोमूत्र शिंपडले. भाजपच्या सत्ताकाळात भ्रष्टाचारामुळे विधानसौध अपवित्र झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी विधानसौधाच्या (विधानसभा) गेटवरही पूजा केली.

हवन-पूजनानंतर हनुमान चालिसाचे पठण केले. भाजपने भ्रष्टाचाराने विधानसौधला बरबाद केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

(Congress Purifies Karnataka Vidhana Saudha)

Congress Purifies Karnataka Vidhana Saudha by sprinkle Gomutra And Gangajal
G20 पर्यटन वर्किंग ग्रुपची आजपासून बैठक, श्रीनगरमध्ये तीन दिवसीय बैठकीच आयोजन

काँग्रेसच्या या कृतीचे फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. सोमवारी कर्नाटक विधानसभेत नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही आमदारपदाची शपथ घेतली.

शपथविधीसाठी मंड्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी गनिगा हे बैलगाडीतून विधानसौध परिसरात आले.

दरम्यान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी या वर्षीच जानेवारी महिन्यात बोलताना विधानसभा गोमूत्राने स्वच्छ करण्याची वेळ आली असल्याचे म्हटले होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 135 जागा जिंकल्या आहेत.

Congress Purifies Karnataka Vidhana Saudha by sprinkle Gomutra And Gangajal
Jharkhand: 12 वर्षाची नवरी 45 वर्षाचा नवरा; ऐन लग्नसमारंभात दाखल झाले पोलिस अन्...

दरम्यान, काँग्रेसने सत्तेत आल्यास बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनेवर तसेच पीएफआय या संघटनेवर बंदी घालण्यात येईल, असे आश्वासन जाहिरनाम्यातून दिले होते. आता काँग्रेस ते कधी पुर्ण करतेय, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

कारण भाजपने हाच मुद्दा बनवत प्रचार केला होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान करताना बजरंगबली की जय, अशी घोषणा देण्याचे आवाहन केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com