Jharkhand: 12 वर्षाची नवरी 45 वर्षाचा नवरा; ऐन लग्नसमारंभात दाखल झाले पोलिस अन्...
Jharkhand: झारखंडमधील पलामूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 12 वर्षांच्या मुलीचे लग्न 45 वर्षाच्या व्यक्तीसोबत जबरदस्ती केले जात होते. दरम्यान, याचवेळी कोणीतरी पोलिसांना याची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस, सीडब्ल्यूसी आणि चाइल्डलाइन यांनी संयुक्तपणे कारवाई करत हा विवाह थांबवण्यात आला.
पोलिसांनी नवऱ्या मुलाला अटक केली आहे. तर मुलीला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या लग्नाला मुलीच्या कुटुंबीयांनीच संमती दिली होती. त्यांचीही पोलीस चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रेडमा येथील ठाकूरबारी मंदिरात एका 12 वर्षीय मुलीचे 45 वर्षीय व्यक्तीसोबत लग्न होत असल्याची माहिती चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक 1098 वर कोणीतरी पोलिसांना दिली होती. पोलिसांनाही याबाबत माहिती घेतली. त्यानंतर पोलीस, सीडब्ल्यूसी आणि चाइल्डलाइनचे लोक विवाह सोहळा सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचले.
पोलिसांना पाहताच लग्नातील लोक घाबरले. पोलिसांनी आधी नवऱ्याला अटक केली. नवरा मुलगा पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कनकेकला येथील रहिवासी आहे. त्याची आणि मुलीच्या कुटुंबीयांची अद्याप चौकशी सुरू आहे. मुलीला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.
यापूर्वी मध्य प्रदेशातील आगर माळवा येथूनही असेच एक प्रकरण समोर आले होते. येथील सुसनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेहंदी गावात एक महिला तिच्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत होती. मात्र तिच्या पतीने याबाबत पोलिसांत तक्रार केली.
दरम्यान, पोलिसांनी महिला, तिचा भाऊ आणि वडिलांना पोलीस ठाण्यात घेऊन जात चौकशी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.