G20 पर्यटन वर्किंग ग्रुपची आजपासून बैठक, श्रीनगरमध्ये तीन दिवसीय बैठकीच आयोजन

भारतात आत्तापर्यंत 146 ठिकाणी G20 बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
G20 Kashmir Meeting
G20 Kashmir MeetingDainik Gomantak

G20 Kashmir Meeting: काश्मीरमध्ये आजपासून तीन दिवसीय जी-20 बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पण या बैठकीमध्ये चीन, तुर्की आणि सौदी अरब हे देश सहभागी होणार नाहीत. या बैठकीत 25 देश सहभागी होतील अशी माहिती आहे. दुपारी 3 वाजल्यापासून बैठकीला सुरूवात होणार आहे.

श्रीनगरमध्ये रस्त्यावरील भिंतींवर सुंदर चित्राद्वारे सजावट करण्यात आलेली आहे. याचा व्हडिओ एएनआयने शेअर केला आहे.

श्रीनगरच्या डल लेकमध्ये असलेल्या शेर - ए- काश्मिर इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटरमध्ये ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत 25 देशातील 60 पेक्षा अधिक प्रतिनिधी तसेच जवळपास 100 पेक्षा अधिक पर्यटन क्षेत्राशी जोडलेले लोक सहभागी होणार आहेत.

जी20 च्या पार्श्वभूमीवर काश्मिरमध्ये कडक बंदोबदस्त ठेवण्यात आला आहे. शेर - ए- काश्मिर इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटरमध्येच्या दिशेने जाणारे दोन्ही रस्ते पुढील दोन दिवसांसाठी सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. प्रतिनिधींची संख्या पाहता सुरक्षेच्या कारणास्तव गुलमर्गचा दौरा रद्द करण्यात आला आहे. 

G20 Kashmir Meeting
1984 Roits: राजीव गांधींच्या मित्रावर 39 वर्षात चौथ्यांदा सीबीआयकडून चार्जशीट

G20 चे को ऑर्डिनेटर हर्षवर्धन सिंगला यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही देश बैठकीसाठी सहभागी नाही झाले तरी ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी बैठक होणार आहे. या बैठकीमुळे काश्मीरबाबतीत लोकांचा असणारा गैरसमज दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच जम्मू काश्मिरच्या Rural Livelihood Mission अंतर्गत गेल्या तीन वर्षात काश्मिरच्या स्थानिक महिलांनी तयार केलेल्या सामानाचे देखील प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. 

जगभरात काश्मीर हे हँडक्राफ्टसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर प्रशासनाने G20 बैठकीसाठी क्राफ्ट बाजारचे देखील आयोजन केले आहे.  यामध्ये फक्त जम्मू काश्मीरमधील हँडीक्राफ्ट वस्तूंचे प्रदर्शन नाही ठेवले तर ती कशी बनवली जाते, याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. शाल आणि कालीन बरोबरच  MACHIE आणि तांब्याच्या वस्तूंचे देखील प्रदर्शन मांडण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com